नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. यामुळे देशातील सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. तसेच, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. दरम्यान, इंधन दरवाढीच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेल आणि गॅस क्षेत्रातील भारतासह जगभरातील कंपन्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीईओ) चर्चा करणार आहेत.या बैठकीचे आयोजन नीती आयोगाकडून करण्यात येत आहे. असे समजते की, या बैठकीत इराणवर अमेरिकेने लावलेले प्रतिबंध आणि कच्चा तेलाच्या वाढत्या किमती यावर चर्चा होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, आजच्या होणाऱ्या वार्षिक बैठकीत तेल, गॅस आणि उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत निर्यात देशांच्या संघटनेचे महासचिव मोहम्मद बारकिंदो आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित असणार आहेत.
शुल्ककपातीनंतर दरवाढ सुरुचकेंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत चार ऑक्टोबरला प्रतिलिटर अडीच रुपयांची कपात जाहीर केली. मात्र त्यानंतरही दररोज इंधनाच्या दरात वाढ होतच आहे.