PM Modi Modi at Pokhran: पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) मंगळवारी(दि.12) तिन्ही सैन्यांचा संयुक्त 'भारत शक्ती' सराव पाहण्यासाठी राजस्थानच्या पोखरण (pokharan) फायरिंग रेंजवर पोहोचले. यावेळी तिन्ही सैन्यांने (indian army) स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उपकरणांची ताकद दाखवली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण आपल्या तिन्ही सैन्यांचे शौर्य पाहिले. ही नवीन भारताची हाक आहे.'
ही खरी भारताची शक्ती मोदी पुढे म्हणतात, 'आज आपण आपल्या तिन्ही सैन्यांचे शौर्य पाहिले. ही नव्या भारताची, हाक चौफेर गुंजत आहे. पोखरण, जे भारताच्या अणुशक्तीचे साक्षीदार आहे, आज इथेच आपण स्वदेशीच्या माध्यमातून आपली ताकद जगाला दाखवत आहोत. आज सर्वजण आपल्या तोफा, रणगाडे, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र प्रणालीची गर्जना ऐकत आहेत. शस्त्रास्त्रे, दारुगोळा, दळणवळणाची साधने, सायबर आणि अंतराळापर्यंत...आपण मेड इन इंडियाच्या उड्डाणाचा अनुभव घेत आहोत. ही खरी भारताची शक्ती आहे.'
10 वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्रात कोणते बदल झाले?पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, 'गेल्या 10 वर्षांत देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारने एकापाठोपाठ एक मोठी पावले उचलली आहेत. आम्ही धोरणाशी संबंधित अनेक सुधारणा केल्या, खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवला, एमएसएमई स्टार्टअपला प्रोत्साहन दिले. गेल्या 10 वर्षांत भारताने स्वतःचे लढाऊ विमान विकसित केले. भारताने स्वत:चे विमानवाहू जहाज तयार केले. C295 वाहतूक विमानेदेखील भारतात तयार केली जाताहेत. आज आधुनिक इंजिनेही भारतात तयार होताहेत.'
स्वावलंबी भारताशिवाय विकास अशक्य 'आज देशात उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये संरक्षण कॉरिडॉर तयार केले जात आहेत. यामध्ये आतापर्यंत 7 हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक झाली आहे. आज आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर बनवणारा कारखाना भारतात कार्यरत झाला आहे. भारताच्या शक्तीचा उत्सव शौर्याची भूमी असलेल्या राजस्थानमध्ये पाहायला मिळतोय. मात्र याचा ध्वनी जगभरात ऐकू येत आहे. स्वावलंबी भारताशिवाय विकसित भारताची संकल्पना शक्य नाही. भारताचा विकास करायचा असेल तर इतरांवरील अवलंबित्व कमी करावे लागेल. त्यामुळे आज भारत खाद्यतेलापासून आधुनिक विमानापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबनावर भर देत आहे,' असंही मोदी यावेळी म्हणाले.
संरक्षण निर्यातीत 8 पटीने वाढली 'येत्या काही वर्षांत जेव्हा आपण जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनू, तेव्हा भारताची लष्करी क्षमताही नवीन उंची गाठेल. भारताला तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनवण्यात राजस्थान मोठी भूमिका बजावेल. विकसित राजस्थान विकसित सैन्यालाही तितकेच सामर्थ्य देईल. भविष्यात भारतीय लष्कर आणि भारताचे संरक्षण क्षेत्र मोठे होणार आहे. तरुणांसाठी यात अनेक रोजगारा आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. भारत एकेकाळी जगातील सर्वात मोठा संरक्षण आयातदार देश होता. आज भारत संरक्षण क्षेत्रात मोठा निर्यातदार बनत आहे. 2014 च्या तुलनेत आज भारताच्या संरक्षण निर्यातीत 8 पटीने वाढ झाली आहे,' अशी माहितीही मोदींनी यावेळी दिली.