नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या एका शायरीचा उल्लेख केला. मोदींनी शायरीच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित असलेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यावर निशाणा साधला. तुमचा नवा भारत तुमच्याकडेच ठेवा आणि आम्हाला जुना भारत परत द्या, अशा शब्दांत आझाद यांनी मोदींना लक्ष्य केलं होतं. आझाद यांच्या टीकेला मोदींनी काल (बुधवारी) शायरीच्या माध्यमातून उत्तर दिलं. गालिबनं अशा (आझाद यांच्यासारख्या) माणसांसाठी म्हटलं होतं, असं म्हणत मोदींनी एक शायरी ऐकवली. 'ता उम्र गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी, आईना साफ करता रहा,' असं मोदी म्हणाले. आझाद यांना सर्व गोष्टींकडे राजकीय नजरेतून पाहण्याची सवय झाल्याचा टोला मोदींना शायरीतून लगावला. आम्ही लोकांच्या हितासाठी अनेक प्रक्रिया सोप्या केल्या आहेत, असं म्हणत मोदींनी आझाद यांना जुन्या भारतावरुन आझाद यांना काही प्रश्न विचारले. कॅबिनेटनं घेतलेले निर्णय पत्रकार परिषदेत फाडणारा, संरक्षण दलांच्या सामग्रीचा वापर सहलीसाठी करणारा जुना भारत तुम्हाला हवा आहे का, असे सवाल पंतप्रधानांनी उपस्थित केले.
मोदींनी शायरी गालिबच्या नावानं खपवली; जावेद अख्तर यांनी चूक पकडली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 9:33 AM