PM Modi Karnataka Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कर्नाटकातील म्हैसूरमध्ये 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी मांड्यामध्ये 2 किलोमीटरचा रोड शो केला. रोड शो दरम्यान हजारो लोक मोदींना पाहण्यासाठी जमले होते. यावेळी लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुष्पवृष्टी केली. पंतप्रधान मोदींनीही गाडीतून उतरुन लोकांना अभिवादन केले.
मे महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने मांड्यातील पंतप्रधानांची उपस्थिती राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. मांड्या जिल्हा जुन्या म्हैसूर प्रदेशाचा एक प्रमुख भाग आहे आणि पारंपारिकदृष्ट्या जनता दल सेक्युलर (एस) चा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत आणि एक वगळता सर्व जेडी(एस) च्या ताब्यात आहेत. 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत एक जागा (केआर पेट) जिंकून भाजपने मांड्या जिल्ह्यात प्रवेश केला होता.
पंतप्रधानांनी एक्स्प्रेस वेचे उद्घाटन केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांड्या जिल्ह्यात एका जाहीर सभेत बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर ते म्हणाले की, बंगळुरू आणि म्हैसूर ही कर्नाटकातील महत्त्वाची शहरे आहेत. एक तंत्रज्ञानासाठी आणि दुसरा परंपरेसाठी ओळखला जातो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दोन्ही शहरे जोडणे अत्यंत गरजेचे आहे. दोन शहरांदरम्यान प्रवास करणारे लोक जड वाहतुकीची तक्रार करत होते, परंतु आता हा एक्स्प्रेस वे केवळ एका तासात हे अंतर कापेल.
बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती मार्गNH-275 वरील 118 किमीचा बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवे हा दहा लेनचा महामार्ग आहे. यामुळे कर्नाटकची राजधानी बंगळुरू आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हैसूर दरम्यानचा प्रवास वेळ तीन तासांवरून 75-90 मिनिटांपर्यंत कमी होईल.द्रुतगती मार्गावर नऊ मोठे पूल, 42 छोटे पूल, 64 अंडरपास, 11 ओव्हरपास आणि चार रेल्वे ओव्हर ब्रिज आहेत. महामार्गालगतच्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बिदाडी, रामनगर-चन्नापटना, मद्दूर, मंड्या आणि श्रीरंगपट्टणाभोवती पाच बायपास आहेत.एक्स्प्रेसवेवरील कार/जीप/व्हॅनसाठी एकेरी प्रवासासाठी 135 रुपये आणि एका दिवसात परतीच्या प्रवासासाठी 205 रुपये टोल शुल्क आहे. मासिक पाससाठी 4,525 रुपये प्रस्तावित होते, जे एका महिन्यात 50 प्रवास कव्हर करेल. म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा यांनी सांगितले की, कारसह LMV ला बंगळुरू ते म्हैसूर या संपूर्ण प्रवासासाठी 250 रुपये टोल भरावा लागेल.
संबंधित बातमी- 'काँग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण...' PM मोदींचा विरोधकांवर घणाघात
याशिवाय पंतप्रधान म्हैसूर-कुशालनगर दरम्यानच्या चौपदरी महामार्गाची पायाभरणी करतील. 92 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग सुमारे 4,130 कोटी रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी हुबळी-धारवाडमधील IIT धारवाड राष्ट्राला समर्पित करणार आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांनी त्याची पायाभरणी केली होती. त्याच्या विकासासाठी 850 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.