देशाचे किती तुकडे करणार? काँग्रेस खासदाराच्या वेगळ्या देशाच्या मागणीवर PM मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 10:12 PM2024-02-05T22:12:41+5:302024-02-05T22:13:30+5:30

काँग्रेस खासदार डीके सुरेश यांनी वेगळ्या देशाबाबत वक्तव्य केले होते.

PM Modi Slams DK Suresh: How many parts of the country you want? PM Modi hits out at Congress MP's demand for a separate country | देशाचे किती तुकडे करणार? काँग्रेस खासदाराच्या वेगळ्या देशाच्या मागणीवर PM मोदींचा घणाघात

देशाचे किती तुकडे करणार? काँग्रेस खासदाराच्या वेगळ्या देशाच्या मागणीवर PM मोदींचा घणाघात

PM Modi Slams DK Suresh: राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) लोकसभेत (LokSabha) काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार डीके सुरेश (DK Suresh) यांच्या कथित वेगळ्या देशाच्या मागणीवर नाराजी व्यक्त केली. 

माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल; PM मोदींना विश्वास

डीके सुरेश हे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचे भाऊ आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, डीके सुरेश यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) म्हटले होते की, विविध करांमधून गोळा केलेल्या निधीच्या वितरणाच्या बाबतीत दक्षिणेकडील राज्यांवर होत असलेला 'अन्याय' थांबवला नाही, तर दक्षिणेकडील राज्ये वेगळ्या देशाची मागणी करतील. 

काय म्हणाले पीएम मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत डीके सुरेश यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, 'देशात आता वेगळ्या देशाची मागणी केली जात आहे. देश जोडण्याचे सोडा, इथे तोडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तुमच्या मनात नेमकं काय आहे? देशाचे इतके तुकडे करुनही तुमचे मन शांत होत नाही का? तुम्हाला आणखी किती तुकडे करायचे आहेत?" असा सवाल मोदींनी यावेळी केला.

'पीएम मोदींना काय झालंय? ते थकले आहेत का?', शशी थरुर यांची पंतप्रधानांवर खोचक टीका

डीके सुरेश यांच्यावर भाजपचा हल्लाबोल
बंगळुरू ग्रामीण मतदारसंघाचे खासदार डीके सुरेश यांच्या कथित वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी (4 फेब्रुवारी) रोजी सुरेश यांच्या घराबाहेर निषेध नोंदवला. वाद वाढल्यानंतर सुरेश म्हणाले की, "मी कधीच म्हटले नाही की या देशाची फाळणी झाली पाहिजे. भाजप या दिशेने वाटचाल करत आहेत, ते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत."

 

Web Title: PM Modi Slams DK Suresh: How many parts of the country you want? PM Modi hits out at Congress MP's demand for a separate country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.