Narendra Modi Vs Nitish Kumar Tejashwi Yadav, Bihar Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांच्या अविश्वास ठरावावरील चर्चेला उत्तर दिले. सुमारे 133 मिनिटांच्या उत्तरात पंतप्रधान मोदींनी विरोधी आघाडी I.N.D.I.A. वर निशाणा साधला आणि त्याला 'अहंकारी युती' म्हटले. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नितीश कुमार म्हणाले की, मोदी सरकार विरोधकांच्या आघाडीवर नाराज आहेत. तर तेजस्वी म्हणाले की, पीएम मोदी विरोधी आघाडीला घाबरतात, म्हणूनच ते आमच्या आघाडीला अहंकारी म्हणत आहेत.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत नितीश कुमार म्हणाले. "संसदेत कार्यवाही सुरूच असते पण, ते बाहेर फिरत राहतात. मोदी सरकार आमच्या विरोधी आघाडी 'इंडिया'वर नाराज आहे. पण 'इंडिया' आघाडी देश आणि राज्याच्या हितासाठी स्थापन करण्यात आली आहे. हे लोक (भाजपा सरकार) काम करत नाहीत, फक्त बोलत राहतात. बिहारमध्ये पंतप्रधानांना त्यांची घोषणा पूर्ण करता आली नाही. त्यांनी बिहारला विशेष दर्जा दिला नाही. तो दिला असता तर आणखी विकास झाला असता. ते म्हणाले, 2005 आणि 2010 च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला जास्त जागा मिळाल्या होत्या, पण 2020 मध्ये त्यांनी एजंट (चिराग पासवान) मैदानात उतरवून आमचा पराभव केला. 2024 च्या निवडणुकीत बिहारमधून भाजपचा सफाया होईल," असा इशारा त्यांनी दिला.
तेजस्वी यादवही म्हणाले...
तेजस्वी यादव यांनीही पीएम मोदींवर निशाणा साधला. "विरोधक एकत्र येत आहेत. मोदीजींना याची भीती वाटते, म्हणूनच ते विरोधी आघाडीला अहंकारी म्हणत आहेत. काल पीएम मोदी चौकार आणि षटकारांबद्दल बोलत होते, पण त्यांचा केवळ भ्रम आहे. योग्य वेळ आली की त्यांना प्रत्यय येईल," अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.