शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जसलमेरमध्ये; जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

By कुणाल गवाणकर | Published: November 14, 2020 11:26 AM

पंतप्रधान मोदी राजस्थानमध्ये पोहोचले

नवी दिल्‍ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी ते राजस्थानच्या जसलमेरमध्ये पोहोचले आहेत. मोदी लोंगेवालात जवानांसोबत दिवाळी साजरी करतील. यावेळी सीडीएस बिपिन रावत, लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थानादेखील मोदींसोबत असतील. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात लोंगेवालात तुंबळ युद्ध झालं होतं. अवघ्या १२० भारतीय जवानांनी अतुलनीय साहस दाखवत पाकिस्तानी लष्कराच्या रणगाड्यांच्या अनेक तुकड्या नेस्तनाबूत केल्या होत्या.२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हापासून ते दिवाळी जवानांसोबत साजरी करतात. त्यांनी आतापर्यंत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. कालच भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यात पाकिस्तानचे ११ सैनिक मृत्यूमुखी पडले. याशिवाय पाकिस्तानी सैन्याचे बंकर आणि लॉन्चिंग पॅड्सदेखील उद्ध्वस्त झाले.लोंगेवालातील लढाई; भारताचे १२० जवान पाकिस्तानच्या रणगाड्यांवर भारीभारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये झालेल्या लढाईत जसलमेरच्या वाळवंटात भारतीय जवानांनी दाखवलेलं शौर्य निर्णायक ठरलं. भारतीय जवानांनी दिलेल्या झुंजीमुळे पाकिस्तानचे मनसुबे उधळले गेले. जसलमेरवर कब्जा करण्याच्या हेतूनं पाकिस्तानी लष्कर रणगाड्यांच्या ३ तुकड्या घेऊन घुसलं होतं. त्यावेळी मेजर कुलदीप सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली १२० जवानांनी अतुलनीय शौर्य आणि पराक्रमाचं दर्शन घडवलं. पाकिस्तानी सैन्याला रोखून धरा किंवा माघार घ्या, अशा सूचना त्यांना वरिष्ठांकडून मेजर कुलदीप यांना देण्यात आल्या होत्या.मातृभूमीच्या रक्षणासाठी लढू, गरज पडल्यास धारातीर्थी पडू, पण इंचनइंच लढवू, असा पवित्रा मेजर कुलदीप सिंग यांनी घेतला. पाकिस्तानच्या रणगाड्यांना रोखण्यासाठी वाळवंटात रणगाडे विरोधी सुरुंग पेरण्यात आले. भारतीय जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत पाकिस्तानचे सगळे डावपेच हाणून पाडले. भारतीय सैन्यानं जसलमेरच्या वाळवंटात पराक्रम गाजवला आणि इतिहास रचला. भारतीय सैन्याच्या याच शौर्यावर 'बॉर्डर' चित्रपट आला होता. त्यात मेजर कुलदीप सिंग यांची भूमिका सनी देओल यांनी साकारली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Armyभारतीय जवान