नवी दिल्ली - कृषी क्षेत्राशी संबंधित, शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) दर हमी विधेयक 2020, ही दोन विधेयके आवाजी मतदानाने आज राज्यसभेत मंजूर करण्यात आली. यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना, हा भारतीय कृषी इतिहासातील महत्वाचा दिवस असल्याचे म्हटले आहे. तसेच एमएसपी व्यवस्था सुरूच राहील, असे आश्वासनही पंतप्रधान मोदींनी दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे, 'भारताच्या कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस मोठा आहे. संसदेत महत्वाचे विधेयक मंजूर झाल्याबद्दल मी आपल्या अन्नदात्यांचे अभिनंदन करतो. यामुळे कृषी क्षेत्रत केवळ अमुलाग्र बदलच होणार नाही, तर यामुळे कोट्यवधी शेतरी सशक्त होतील.'
आधुनिक तंत्रज्ञानाची तत्काळ आवश्यकता -मोदी म्हणाले, “कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची तत्काळ आवश्यकता आहे. यामुळे मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल. ही विधेयके मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानापर्यंत पोहोचणे सहज सोपे होईल. यातून केवळ उत्पादनच वाढणार नाही. तर इतरही चांगले परिणाम दिसून येणार आहेत. हे पाऊल स्वागत करण्यासारखे आहे.”
एमएसपी व्यवस्था कायम राहील -एमएसपीवर बोलताना मोदी म्हणाले, “मी आधीही बोललो आहे आणि पुन्हा एकदा सांगतो एमएसपी व्यवस्था कायम राहील. सरकारी खरेदीही कायम राहिल. आम्ही येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी शक्य ते प्रयत्न करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचे जगणे अधिक सुखकर करू.”
आता शेतकऱ्यांना दलालांचा समना करावा लागणार नाही -"अनेक दशकांपासून आपले शेतकरी बांधव, अनेक प्रकारच्या बंधनांत अडकले होते आणि त्यांना दलालांचा समना करावा लागत होता. आता ही विधेयके संसदेत मंजूर झाल्याने, या सर्वांतून शेतकऱ्यांची मुक्ती झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांना बळकटी येईल आणि त्यांची समृद्धी निश्चित होईल," असेही मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या -
मास्क न लावल्याने झाली 500 रुपयांची शिक्षा, वकिलानं मागितली 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई
डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न! व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच पकडलं विषाचं पाकीट
केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य
भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी