PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा अमेरिका दौरा भारतासाठी खूप खास आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस खासदार शशी थरुर यांनीही पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे कौतुक केले आहे.
काही प्रमुख चिंता दूर केल्याकाँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेतून आतापर्यंत जे काही आम्ही पाहिले, ते खूप उत्साहवर्धक आहे. आपल्या सर्वांच्या काही प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. पीएम मोदी आणि ट्रम्प यांनी एकत्र बसून व्यापार आणि शुल्काच्या प्रश्नावर गंभीर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे, जो सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत संपेल. बेकायदेशीर अनिवासी भारतीयांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावर एकच गोष्ट जाणवली होती की, त्यांना परत कसे पाठवायचे? अन्यथा त्यांची भूमिका अगदी बरोबर होती. हे भरकटलेले तरुण आहेत, ज्यांना बेकायदेशीरपणे स्थलांतर करण्यास प्रवृत्त केले गेले आहे.'
भारताला अपेक्षित सर्वकाही मिळाले थरुर पुढे म्हणाले, 'संरक्षणाच्या आघाडीवर आम्हाला एफ-35 स्टेल्थ विमाने विकण्याची अमेरिकेची वचनबद्धता खूप मोलाची आहे. पीएम मोदींच्या अमेरिकन दौऱ्याबद्दल आतापर्यंत मिळालेल्या माहितीने मी खूप उत्साहित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम कधी परत येईल, मी अधिक तपशीलांची वाट पाहत आहे. अनिवासी भारतीयांना परत कसे पाठवले याविषयीचे आश्वासन वगळता पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यातून आम्हाला (भारताला) जे काही अपेक्षित होते ते सर्व मिळाले आहे,' अशी महत्वाची प्रतिक्रिया थरुर यांनी दिली.