रामेश्वरम (तमिळनाडू): श्रीराम जन्मभुमी अयोध्येत श्रीराम मंदिर (Ram Mandir) उद्घाटन आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी फक्त एक दिवस बाकी आहे. हा ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघा देश रामय झाला आहे. देशवासियांसोबतच पंतप्रधानही रामभक्तीत तल्लीन झालेले दिसत आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांच्या दक्षिण भारताच्या दौऱ्यावर आहेत.
यादरम्यन, रविवारी पंतप्रधान मोदी 'रामसेतु'ची (RamSetu) सुरुवात असलेल्या धनुषकोडीजवळील अरिचल मुनई पॉइंटवर (Arichal Piont) पोहोचले. यावेळी पीएम मोदींनी समुद्राला पुष्प अर्पण करुन पुजा केली. पौराणिक कथेनुसार, अरिचल मुनई पॉइंट हे तेच ठिकाण आहे, जिथे भगवान श्रीरामांनी (Lord Rama) रावणाचा पराभव करण्याची शपथ घेतली आणि येथूनच श्रीलंकेला (SriLanka) जाण्यासाठी राम सेतू बांधला गेला.
यानंतर त्यांनी तेथे उभारलेल्या राष्ट्रीय प्रतीक स्तंभालाही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यापुर्वी शनिवारी पीएम मोदींनी तिरुचिरापल्लीच्या श्रीरंगम येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात जाऊन पूजा केली होती. यानंतर पीएम मोदी तिरुचिरापल्ली येथून हेलिकॉप्टरने अमृतानंद स्कूल कॉम्प्लेक्स, रामेश्वरम येथे पोहोचले आणि अग्नितीर्थम येथे पवित्र स्नान केले. यावेळी त्यांनी मंदिरात भजनात भाग घेतला होता. रामेश्वरम हे चार धामांपैकी एक आहे. बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी आणि द्वारका पुरी हे इतर तीन धाम आहेत.
चेन्नई येथे खेलो इंडिया गेम्सचे उद्घाटन तामिळनाडू पोलिसांनी रामेश्वरममध्ये अतिशय कडक बंदोबस्त तैनात केला होता. तीन हजारांहून अधिक पोलिसही तैनात करण्यात आले होते, तर तटरक्षक दलही धनुषकोडी येथील समुद्रात गस्त घालत होते. पंतप्रधान मोदींनी हस्ते शुक्रवारी चेन्नईमध्ये खेलो इंडिया गेम्स 2023 चे उद्घाटन करण्यात आले.