Assembly election result 2021: बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 10:11 PM2021-05-02T22:11:52+5:302021-05-02T22:14:30+5:30
पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांपैकी एकूण 292 जागांसाठी मतदान झाले होते. यांपैकी टीएमसीला 200हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. (West Bengal Assembly Elections 2021)
नवी दिल्ली - पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरी येथील विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्टच झाले आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या विजयावर पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटले आहे, बंगालमधील विजयासाठी ममता दीदींचे अभिनंदन. केंद्र सरकार लोकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि कोरोना महामारीवर मात करण्यासाठी बंगाल सरकारला शक्य ती सर्व प्रकारची मदत सुरू ठेवेल. (Assembly Election Results 2021)
मोदी म्हणाले, आमच्या पक्षाला आशिर्वाद दिलेल्या पश्चिम बंगालमधील माझ्या बहीण-भावांचे मी आभार मानतो. पूर्वीच्या तुलनेत आता बंगालमध्ये भाजपची शक्ती वाढली आहे. भाजप जनतेची सेवा करत राहील. मी निवडणूकीत पक्ष कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करतो.
Congratulations to Mamata Didi for @AITCofficial's win in West Bengal. The Centre will continue to extend all possible support to the West Bengal Government to fulfil people’s aspirations and also to overcome the COVID-19 pandemic. @MamataOfficial
— Narendra Modi (@narendramodi) May 2, 2021
पंतप्रधान मोदींनी केरळमध्ये मोठा विजय मिळविणारे मुख्यमंत्री पिनरई विजयन आणि तामिलनाडूमध्ये विजयासाठी डीएके प्रमुख एमके स्टॅलिन यांचेही अभिनंदन केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांपैकी एकूण 292 जागांसाठी मतदान झाले होते. यांपैकी टीएमसीला 200हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत.
पश्चिम बंगाल -
मतदान झालेल्या एकूण जागा-292 (बहुमतासाठी 147 सीट्सची आवश्यकता.)
टीएमसी - 214 जागांवर पुढे/विजयी
भाजप - 76 जागांवर पुढे/विजयी
काँग्रेस+लेफ्ट+आयएसएफ- एका जागेवर पुढे /विजयी
इतर - 1 वर पुढे/विजयी
2016च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस (TMC)ला 211 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला केवळ 3 जागाच मिळाल्या होत्या. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 44 आणि डाव्या पक्षांना 26 जागा मिळाल्या होत्या