शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मोदी टीव्हीवर येऊन रडणार; खासदाराची भविष्यवाणी १००% टक्के खरी ठरली; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 9:54 AM

खासदारानं महिनाभरापूर्वी केलेली भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली; डॉक्टरांशी बोलताना पंतप्रधान मोदी भावुक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींचा कंठ दाटून आला, ते भावुक झाले. यानंतर आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी त्यांनी केलेला भविष्यवाणी खरी ठरल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदी देशातील कोरोना परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येऊन रडतील, असं सिंह यांनी गेल्याच महिन्यात म्हटलं होतं. आपल्या या भविष्यवाणीची आठवण सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून करून दिली.मोठी बातमी! मेड इन इंडिया लस कोवॅक्सिनला धक्का; सीरमच्या कोविशील्डला दिलासाआम आदमी पक्षानं एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये संजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरल्याचं म्हटलं आहे. संजय यांनी १७ एप्रिलच्या एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं भाकित २१ मे रोजी खरं ठरलं, असं आपनं पत्रकात नमूद केलं आहे. १७ एप्रिल रोजी संजय यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी 'अजून थोडे दिवस वाट पाहा. ते (पंतप्रधान मोदी) तुमच्यासमोर येतील. ते फक्त त्यांच्या लाईट्स आणि कॅमेरासाठी वाट पाहत आहेत. ते टीव्हीवर रडतील आणि देशभरातील वृत्तवाहिन्या पंतप्रधान कशापद्धतीने भावुक झाले आणि रडू लागले याबद्दलच्या बातम्या दाखवतील,' असं म्हटलं होतं. याच मुलाखतीचा काही भाग शेअर करत संजय सिंह यांनी मोदींवर शुक्रवारी ट्विटरवरुन निशाणा साधला. 'जे १७ एप्रिलला बोललो होतो, ते २१ मे रोजी खरं ठरलं. देशाला एक संवेदनशील आणि चांगल्या मनाची व्यक्ती हवीय. ढोंग करणारे पंतप्रधान देशाला नको, ज्यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन कोरोनाचा प्रसार केला आणि आता रडण्याचं नाटक करत आहेत,' अशा शब्दांत संजय सिंह यांनी शरसंधान साधलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAAPआपcorona virusकोरोना वायरस बातम्या