नवी दिल्ली : संपूर्ण जग आज कोरोनाविरुद्ध लढत आहे. यात भारतही मागे नाही. मात्र, आता प्रत्येक भारतीय नागरिक या संकटाचं संधीत रुपांतर करण्याच्या इच्छाशक्तीने काम करत आहे. ज्या क्षेत्रात भारत मागे आहे. त्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची हीच संधी आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर आज आपल्या मनात एक मोठा 'जर' निर्माण होत आहे, असेही मोदी म्हणाले. ते इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात बंगाली भाषेत केली. हा कार्यक्रम कोलकात्यात पार पडत आहे.
पंतप्रधानांनी सांगितले, भारतीयांच्या मनातील 'जर'...इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमत मोदी म्हणाले, आज प्रत्येक भारतीयाच्या मनात एक 'जर' आहे, जर आपण वैद्यकीय उपकरणे तयार करण्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भर झालो... जर आपण कोळसा आणि खनिजांच्या क्षेत्रांत स्वयंपूर्ण झालो... जर आपण खान्याच्या तेलाच्या उत्पादनात समोर आलो... जर खताच्या उत्पादनात भारत स्वावलंबी झाला... जर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करण्यात भारत स्वयंपूर्ण झाला... असे अनेक 'जर' आज भारतीयांच्या मनात आहेत. गेल्या 5-6 वर्षांत भारताच्या आत्मनिर्भरतेचे लक्ष्य सर्वप्रथम राहिले आहे. कोरोना संकटाने याची गती आणखी वाढवण्याचा धडा दिला आहे. यातूनच आत्मनिर्भर भारत अभियान पुढे आले आहे.
...अन् तेव्हापासून मुलं होणं बंद झालं, पोट धरून हसवणारी लालूप्रसादांची उत्तरं अन् किस्से
समस्यांवरील औषध बळकट होणे आहे -मोदी म्हणाले, समस्यांवरील औषध बळकट होणे हे आहे. कठीण काळाने नेहमीच भारताची इच्छाशक्ती वाढवली आहे. कोरोनानंतर आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने आपल्याला पावले टाकायची आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल, की भारत या-या क्षेत्रांमद्ये आत्मनिर्भर बनू शकतो.
कोरोनाला नक्कीच पराभूत करू -पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण संपूर्ण तागदीनिशी कोरोनाचा सामना करत आहोत. आपण त्यावर नक्कीच विजय मिळवू. आपले कोरोना योद्धे त्याचा सामना करत आहेत.
CoronaVirus News: उन्हामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल की वाढेल? संशोधकांनी दिली धक्कादायक माहिती
आता लोकलपासून व्होकल आणि एक्सपोर्टर बनन्याची वेळ -'कुटुंबातही मुलगा अथवा मुलगी जेव्हा 18-20 वर्षांचे होतात, तेव्हा आई-वडील म्हणतात, की आपल्या पायावर उभे राहायला शिका. आपण आत्मनिर्भर होण्याचा पहिला धडा घरातूनच शिकतो. भारतालाही आपल्या पायावर उभे राहावे लागेल. भारताने परावलंबित्व कमी करावे. दुसऱ्या देशांवर कमितकमी अवलंबून राहावे. जी गोष्ट भारताला आयात करावी लागते, ती भारतातच कशी तयार होईल? आणि भविष्यात भारतच त्या गोष्टींचा एक्पोर्टर कसा बनेल? या दिशेने आपल्याला काम करावे लागेल. लोकलसाठी व्होकल होण्याची वेळ आहे. देशाला आणि प्रत्येक जिल्ह्याला आता आत्मनिर्भर बनवण्याची वेळ आहे,' असेही मोदी म्हणाले.
दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...