अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक अर्हतेवरून शंकाकुशंकांना पेव फुटले असतानाच मोदी यांनी सुमारे ३३ वर्षांपूर्वी राज्यशास्त्रात एम.ए. ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत मिळविली असल्याचा खुलासा गुजरात विद्यापीठाने रविवारी केला. बाह्य विद्यार्थी म्हणून ही परीक्षा दिलेल्या मोदींना ६२.३ टक्के गुण मिळाले होते. गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू एम.एन. पटेल यांनी ही माहिती देताना सांगितले की, नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी १९८३ साली राज्यशास्त्र या विषयात एम.ए. केले होते. त्या परीक्षेत मोदींनी ८०० पैकी ४९९ गुण मिळविले होते.कुलगुरू पटेल म्हणाले की, अनेक आरटीआय अर्जांच्या माध्यमाने मोदींच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल यापूर्वीही माहिती मागण्यात आली होती. परंतु तांत्रिक कारणांमुळे आरटीआय कायद्याअंतर्गत ही माहिती उघड करणे आम्हाला शक्य नव्हते. आताही यासंदर्भात केंद्रीय माहिती आयोगाचे आदेश विद्यापीठाला मिळालेले नाहीत. परंतु आयोगाने तसे आदेश दिल्याचे माध्यमांमधून समजल्याने आपण माहिती देत आहोत. आयोगाचे औपचारिक आादेश मिळताच संबंधित अर्जदारांना ही माहिती दिली जाईल. पंतप्रधानांच्या बी.ए.पदवीबद्दल विचारले असता कुलगुरूंनी, आम्ही २० वर्षांपूर्वीची माहिती देऊ शकत नाही असे सांगितले.नरेंद्र मोदींचे विषयवार गुण कुलगुरू पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांनी एम.ए. प्रथम वर्षात ४०० पैकी २३७ गुण तर द्वितीय वर्षात ४०० पैकी २६२ गुण प्राप्त केले होते. त्यांना राज्यशास्त्र विषयात ६४ गुण मिळाले होते. याशिवाय युरोपीय आणि सामाजिक राजकीय विचारमध्ये ६२, आधुनिक भारत/ राजकीय विश्लेषण ६९ आणि राजकीय मानसशास्त्र या विषयात ६७ गुण मिळवले होते.
पंतप्रधान मोदी राज्यशास्त्रात एम.ए.
By admin | Published: May 02, 2016 2:28 AM