नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला 71 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने भजप 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच पुढील तीन आठवड्यांपर्यंत विविध कार्यक्रम राबवणार आहे. याच बरोबर भाजपकडून 'सेवा आणि समर्पण' मोहीमही राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे, 7 ऑक्टोबर 2021 रोजी मोदींच्या प्रशासकीय जीवनाचे 20 वर्षही पूर्ण होत आहेत. (PM Narendra Modi 71st birthday know about the bjp 3 week long celebration plan)
या कार्यक्रमांतर्गत, 14 कोटी रेशन बॅग, 5 कोटी Thank-you Modiji पोस्टकार्ड देशभरातील बूथवर पाठवले जातील, नद्या स्वच्छ करण्यासाठी 71 ठिकाणं निश्चित केली जातील, तसेच सोशल मीडियावर हाय-प्रोफाइल कॅम्पेन, तसेच कोविड लसीकरण आणि पंतप्रधान मोदींचे आतापर्यंतचे कार्य आणि त्यांच्या जीवनावर एक सेमिनार आयोजित करण्यात येईल.
उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली; PM मोदींचे सर्व मंत्र्यांना खास निर्देशगेल्या वर्षी भारतीय जनता पक्षाने (पीएम) नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण आठवडाभर सेवा सप्ताह साजरा केला होता. परंतु यावेळी, त्यांचा वाढदिवस विशेष बनविण्यासाठी आणि त्याला मोठे स्वरूप देण्यासाठी, त्याचे नावही 'सेवा आणि समर्पण अभियान', असे ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान, देशात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोसची संख्या किमान 70 कोटींचा टप्पा ओलांडू शकते, त्यामुळे पक्षाला आशा आहे, की या अभियानाद्वारे लोकांच्या मताला पुन्हा एक आकार दिला जाऊ शकतो.
मोदी सरकारची ‘या’ कंपनीशी सेटलमेंट; हजारो कोटींच्या मोबदल्यात सर्व खटले घेणार मागे!असा आहे भाजपचा संपूर्ण प्लॅन -
- पंतप्रधान मोदींच्या फोटो असलेल्या 14 कोटी रेशन बॅग वाटण्यात येतील. याच बरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत लोकांना 5 किलो रेशनच्या पिशव्या दिल्या जातील. (आतापर्यंत भाजप शासित राज्यांमध्ये एकूण 2.16 कोटी बॅग वाटण्यात आल्या आहेत.)
- करोना महामारीच्या काळात सुविधा मिळालेल्या लाभार्थ्यांचा ‘थँक यू मोदीजी’चा व्हिडिओ दाखवला जाईल.
- देशभरातील बूथ स्तरावरून ‘थँक यू मोदीजी’सह 5 कोटी पोस्टकार्ड पाठवले जातील.
- पंतप्रधान मोदींचा 71 वा वाढदिवस आहे, त्यामुळे नद्या स्वच्छ करण्याचे अभियान 71 ठिकाणी राबवली जाईल.
- ज्यांना कोरोना लस मिळाली आहे, त्यांचा व्हिडिओ प्रसारित केला जाईल.
- राज्य आणि जिल्हा स्तरावर आयोजित मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि चर्चासत्रांची झलक दाखविली जाईल. याशिवाय, पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासावर एक व्हिडिओही प्रसिद्ध होईल.
- प्रख्यात लेखकांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक होईल. प्रादेशिक भाषांचे लेखकही यात सामील होतील.
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या मदतीसाठी नोंदणी मोहीम राबवली जाईल आणि त्यांना पीएम केअर फंडातून मदत केली जाईल.
- पंतप्रधान मोदींना मिळालेल्या सन्मानचिन्हांच्या लिलावांसंदर्भातही लोकांना माहिती दिली जाईल.