India China Face Off: पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठक आज; जाणून घ्या, कोण होणार सहभागी, कुणाला निमंत्रण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 09:10 AM2020-06-19T09:10:11+5:302020-06-19T09:18:16+5:30
या बैठकीत, चीनसोत सुरू असलेला वाद आणि सद्य स्थितीवर चर्चा होणार आहे. ही बैठक सायंकाळी पाच वाजता व्हर्च्युअल (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पद्धतीने होईल. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत.
नवी दिल्ली : भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत भारताचाच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. यानंतर संपूर्ण देशात चीन विरोधात संतापाचे वातावरण असून चीनला चोख उत्तर द्यावे, असा सूर उमटत आहे. याच मुद्द्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात राजकीय पक्षांचे अध्यक्ष सहभागी होणार आहेत.
या बैठकीत, चीनसोत सुरू असलेला वाद आणि सद्य स्थितीवर चर्चा होणार आहे. ही बैठक सायंकाळी पाच वाजता व्हर्च्युअल (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पद्धतीने होईल. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. मात्र काही राजकीय पक्षांना या बैठकीचे निमंत्रण मिळालेले नाही. यामुळे वादही उत्तपन्न होण्याची शक्यता आहे.
India China Faceoff : हिंसक झटापटीत चीनचे 35 सैनिक ठार, अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीपूर्वी सर्व महत्वांच्या पक्षांच्या अध्यक्षांशी फोनवरून चर्चा केली. या बैठकीत एकूण 16 राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत.
या बैठकीत, सोनिया गांधी, एमके स्टालिन, एन. चंद्रबाबू नायडू, जगन रेड्डी, शरद पवार, नीतीश कुमार, डी. राजा, सीताराम येचुरी, नवीन पटनायक, के. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, सुखबीर बादल, चिराग पासवान, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव आणि हेमंत सोरेन आदी नेते सहभागी होऊ शकतात.
गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO
अनेक राजकीय पक्षांना न बोलावल्याने होऊ शकतो वाद -
पंतप्रधानांनी बोलावलेल्या या बैठकीपूर्वीच वादाला तोंड फुटले आहे. आम आदमी पार्टीकडून आरोप करण्यात आला आहे, की त्यांचे चार खासदार आहेत. राज्यसभेतही प्रतिनिधी आहेत. असे असतानाही त्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. तसेच राष्ट्रीय जनता दलालाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे तेजस्वी यादव यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पक्षांच्या लोकसभेत पाच अथवा त्याहून अधिक जागा आहेत, केवळ त्यांनाच या बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, टीडीपीचे चार खासदार असतानाही त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण
15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले. यात चीनचे 35 जवान मारेल गेले असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे.
या घटनेनंतर देशात संतापाचे वातावरण आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधींसह देशातील अनेक विरोधीपक्ष नेत्यांनी यासंदर्भात सरकारकडे चीनला चोख उत्तर देण्याची मागणी केली आहे.
पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'