पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी नुकसानग्रस्तांना १ हजार कोटींची मदत जाहीर केली. यावर ममता बॅनर्जी कमालीच्या संतप्त झाल्या आणि जोरदार टीका केली आहे.
मोदी यांच्या या घोषणेवर ममता यांनी पश्चिम बंगालचे १ लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत पंतप्रधानांनी केवळ १ हजार कोटी देण्याची घोषणा केल्याचे म्हटले आहे. तसेच या घोषणेमधील कोणतीही माहिती आपल्याला दिलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ही रक्कम कधी मिळेल, ही रक्कम सुरुवातीची आहे का, याबाबत काहीही माहिती नाही. अम्फान वादळामुळे आमचे १ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. उलट आमचेच केंद्राकडे ५३ हजार कोटी रुपये थकलेले आहेत, अशी टीका ममता यांनी केली.
अन्य महत्वाच्या बातम्या....
कोरोनाच्या संकटात 5G ची पेरणी; Oppo Find X2 Neo स्मार्टफोन लाँच
देशाचा जीडीपी शुन्याखाली जाण्याची शक्यता; आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा अंदाज
CoronaVirus कोरोनाची मजल पुढच्या सूर्य ग्रहणापर्यंतच; काशीच्या ज्योतिषाचार्यांचे मोठे संकेत
कर्जदारांना मोठा दिलासा; EMI वर आरबीआयचा निर्णय
खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८३ दिवसांनी दिल्ली सोडली; ओडिशा, पश्चिम बंगालचा पाहणी दौरा
चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र