नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील गर्वी गुजरात भवनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. मात्र, याचबरोबर त्यांनी देशवासियांची माफीही मागितली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गेल्या 6 वर्षांत अनेक आरोप झाले आहेत. राफेल करार, पुलवामा हल्ला ते ईव्हीएम हॅकिंगवरून त्यांना बोलण्यासाठी विरोधकांनी भाग पाडण्याच प्रयत्न केला होता. नोटाबंदी, जीएसटीमुळे देशात मंदीचे वारे वाहू लागल्याचा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नुकताच केला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेचा जीडीपी गेल्या 6 वर्षांच्या खाली म्हणजेच 5 वर पोहोचल्याने टीकाही झाली होती. मात्र, मोदींनी या सहा वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेत एकाही आरोपांवर खुलासा केला नव्हता.
आज मोदी यांनी जाहीर कार्यक्रमात गुजरातच्या जनतेची, देशवासियांची आणि जगाची माफी मागितली आहे. यावेळी त्यांनी कारणही सांगितले आहे. जैन परंपरेनुसार पर्युषण काळात क्षमायाचनेची प्रथा आहे. या काळात आपल्याकडून कोणी दुखावला गेला असल्यास खुल्या मनाने माफी मागितली जाते. यामुळे मी गुजरातच्या जनतेची, देशवासियांची आणि जगाची माफी मागत असल्याचे मोदी यांनी सांगितले.
आज गुजरात राज्यासाठीच्या भव्य गर्वी गुजरात भवनाचे उद्घाटन करण्यात आहे. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानीदेखील उपस्थित होते.