शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

मोदींनाही बसला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका; पहिल्यांदाच 50 टक्क्यांच्या खाली उतरला लोकप्रियतेचा ग्राफ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 10:54 AM

मोदींचे अ‍ॅप्रूव्हल रेटिंग गेल्या 1 एप्रिलपूर्वी 73 टक्के होती, ती आता ११ मेरोजी 63 टक्क्यांवर आली आहे! ...तरी 'या' 13 देशांच्या राष्ट्रप्रमुखांत मोदींच No.1!

नवी दिल्ली - कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या नियोजनावरून केंद्रातील मोदी सरकारचे संपूर्ण जगात कौतुक झाले. मात्र, आता देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या नियोजनावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे. कोरोना महामारीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला, तसाच तो पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेलाही बसला आहे. यासंर्भात, मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेतील कंपनीच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूव्हल रेटिंगनुसार आणि भारतीय पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मिडियाने घेतलेल्या सर्वेक्षणानुसार, मोदींची लोकप्रियता घसरली आहे. विशेष म्हणजे ओआरमॅक्सच्या सर्वेक्षणात तर मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख थेट 50 टक्क्यांच्याही खाली आला आहे.

पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मिडियाचे सर्वेक्षण -सर्वप्रथम, भारतातील पॉलस्टरच्या ओआरमॅक्स मिडियाने केलेल्या सर्वेक्षणाचा विचार करता, मोदींची लोकप्रियता काही प्रमाणात घसरली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी मोदींची लोकप्रियता 57 टक्क्यांवर होती. मात्र 11 मेपर्यंत ती 9 टक्क्यांनी घसरून 50 टक्क्यांच्याही खाली म्हणजे 48 टक्क्यांवर आली, असे संस्थेने म्हटले आहे. विशेष म्हणजे मोदींच्या लोकप्रियतेचा ग्राफ पहिल्यांदाच 50 टक्क्यांच्या खाली आला आहे. ओआरमॅक्स मिडियाने 23 राज्यांमधील काही निवडक शहरांत हे सर्वेक्षण केले. 

Rahul Gandhi : PMCares फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर आणि नरेंद्र मोदी 'दोनों फेल हैं…' ; राहुल गांधींची बोचरी टीका

मार्निंग कन्सल्टची ग्लोबल अ‍ॅप्रूव्हल रेटिंग - मार्निंग कन्सल्ट ही ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिका, या 13 देशांच्या राष्ट्र प्रमुखांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा कत असते. तसेच या देशात सर्वसामान्याचे प्रमुख नेत्यांबद्दल नेमके काय मत आहे, हेही ही कंपनी जाणून घेत असते. नुकत्याच समोर आलेल्या मार्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूव्हल रेटिंग’नुसरा, मोदींची लोकप्रियता तब्बल 10 टक्क्यांनी घसरली आहे. 

मोदींचे अ‍ॅप्रूव्हल रेटिंग 73 टक्क्यांहून 63 टक्क्यांवर -मोदींचे अ‍ॅप्रूव्हल रेटिंग गेल्या 1 एप्रिलपूर्वी 73 टक्के होती, ती आता ११ मेरोजी 63 टक्क्यांवर आली आहे. याच बरोबर मोदींच्या डिसअ‍ॅप्रूव्हल रेटिंगचा विचार करता, यात 10 टक्क्यांची वाढ झाली असून एक मेपूर्वी 21 टक्क्यांवर असणारी ही रेटींग 11 मेनंतर 31 टक्क्यांवर गेली आहे. मात्र, असे असले तरी मोदी या 13 देशांच्या राष्ट्र प्रमुखांच्या रेटींगचा विचार करता पहिल्याच स्थानावर आहेत.

“घरात नाही दाणा पण मला 'व्हॅक्सिन गुरू' म्हणा…" ; रुपाली चाकणकरांचे मोदी सरकारवर टीकास्र

...तेव्हा ६९ टक्क्यांवर गेला होता मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख - तत्पूर्वी, चीनसोबतच्या वादादरम्यान मोदी सरकारने चिअॅप्सवर बंदी आणली होती, त्यावेळी ओआरमॅक्स मिडियाने केलेल्या सर्वेक्षणात मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख जवळपास ६९ टक्क्यांवर गेला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याprime ministerपंतप्रधानIndiaभारत