नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना कोणत्या मुद्यांवर बोलले पाहिजे, असे तुम्हाला वाटते. याबाबतचे आपले मत थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचावेत अशी तुमची इच्छा असेल तर नक्कीच पूर्ण होणार आहे. कारण तशी संधी स्वतः पंतप्रधान मोदी यांनी उपलब्ध करुन दिली आहे. स्वातंत्र्य दिनी भाषणामध्ये मी कोणत्या मुद्यांचा समावेश केला पाहिजे, असे विचारत पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरद्वारे सव्वाशे कोटी भारतीयांना साद घातली आहे.
यावर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या भाषणासंदर्भात नागरिकांना थेट सूचना देण्यास सांगितले आहे. यातील काही सूचनांचा पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात समावेश करणार आहेत. नरेंद्र मोदी अॅपद्वारे नागरिक आपल्या सूचना पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकतात. याव्यतिरिक्त MyGov.in वर एक खास पेज http://nbt.in/1Fy_Wa देखील बनवण्यात आले आहे. येथे कमेंट बॉक्समध्ये सहजरित्या आपल्याला सूचना देता येऊ शकणार आहेत.