2014 मध्ये 'आशा' घेऊन आलो, 2019 मध्ये 'विश्वास' आणि आता 2024 मध्ये...'; PM मोदींनी एका शब्दात जनतेचं मन जिंकलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 03:40 PM2024-04-17T15:40:18+5:302024-04-17T15:46:12+5:30
4 जून रोजी निवडणुकीचा निकाल काय लागणार, हे स्पष्टपणे दिसत आहे. 4 जूनला एनडीएचा 400 हून अधिक जागांसह विजय होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्ष हा 'सबका साथ, सबका विकास' या मंत्रावर चालणारा पक्ष आहे. एनडीए सरकारच्या योजनांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही, योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळतो. 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल काय लागणार, हे स्पष्टपणे दिसत आहे. 4 जूनला एनडीएचा 400 हून अधिक जागांसह विजय होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते बुधवारी आसाममधील नलबाडी येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेला संबोधित करत होते.
एनडीए सरकारमध्ये कुणासोबतही भेदभाव होत नाही - PM मोदी
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची भविष्यवाणी करताना मोदी म्हणाले, "4 जूनला काय निकाल येणार आहेत, हे स्पष्टपणे दिसत आहे. यामुळेच लोक म्हणत आहेत, '4 जून, 400 पार! फिर एक बार मोदी सरकार.'" याच बरोबर, "भाजप हा 'सबका साथ-सबका विकास' या मंत्रावर चालणारा पक्ष आहे. एनडीए सरकारच्या योजनांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही. त्यांचा लाभ प्रत्येकाला मिळतो. आता एनडीएने, देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा आणि तो ज्या सुविधेसाठी पात्र असेल, त्या सुविधेचा त्याला लाभ देण्याचा निर्धार केला आहे,
काँग्रेसनं ईशान्येला समस्या दिल्या, पण भाजपनं -
यावेळी मोदी म्हणाले, 2014 मध्ये मोदी तुमच्याकडे आशा घेऊन आला होता. 2019 मध्ये विश्वास घेऊन आला होता आणि आता 2024 मध्ये मोदी तुमच्याकडे गॅरंटी घेऊन आला आहे. मोदीची गॅरंटी म्हणजे, गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी.
ईशान्य तर स्वतःच मोदीच्या गॅरंटीचा साक्षीदार -
तसेच, आज संपूर्ण देशात मोदीची गॅरंटी चालत आहे. ईशान्य तर स्वतःच मोदीच्या गॅरंटीचा साक्षीदार आहे. ज्या ईशान्येला काँग्रेसने केवळ समस्या दिल्या होत्या, त्या ईसान्येला भाजपने शक्यतांचा स्रोत बनवले आहे, असेही मोदी म्हणाले.