शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 7:19 AM

'बालाकोटमधले 300 फोन दिसतात, पण पुलवामातील 50 किलो आरडीएक्स दिसत नाही'

हैदराबाद: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पुलवामा हल्ल्यावेळी बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का, असा सवाल त्यांनी मोदींना विचारला. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन ओवेसी मोदी सरकारवर बरसले. त्यावेळी त्यांनी सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवत सरकारवर तोफ डागली. त्यांनी हैदराबादमध्ये एका बैठकीला संबोधित केलं. 'भारतीय हवाई दलानं बालाकोटवर बॉम्ब टाकले. त्यात 250 दहशतवादी मारले गेले, असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार एनटीआरपीनं त्या भागात 300 मोबाईल फोन सक्रीय असल्याची माहिती दिली होती. तुम्हाला बालाकोटमध्ये सक्रीय असलेले 300 फोन दिसतात. पण पुलवामात तुमच्या नाकाखालून आणण्यात आलेलं 50 किलो आरडीएक्स दिसत नाही,' अशा शब्दांमध्ये ओवेसी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मोदी आणि राजनाथ सिंह काय करत होते? बीफ बिर्यानी खाऊन झोपले होते का?, असे सवाल करत ओवेसींनी टीकेची झोड उठवली. माझी लढाई सांप्रदायिक शक्तींविरोधात आहे. देशातील धर्मनिरपेक्षता आणि बंधुभाव संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात माझा संघर्ष आहे, असं ओवेसी म्हणाले. काँग्रेस आणि भाजपामध्ये अजिबात फरक नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसलादेखील लक्ष्य केलं. असदुद्दीन ओवेसी हैदराबादमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. सलग चौथ्यांदा ते हैदराबादमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील. हा मतदारसंघ एमआयएमचा बालेकिल्ला मानला जातो. तीन दशकांहून अधिक कालावधीपासून हा मतदारसंघ एमआयएमच्या ताब्यात आहे. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सलाहुद्दीन ओवेसी यांनी सलग सहावेळा (1984 ते 2004) या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर ओवेसी सलग तीनवेळा इथून निवडून आले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाindian air forceभारतीय हवाई दल