शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
4
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
5
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
6
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
8
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
9
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
10
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
12
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
13
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
14
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
15
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
16
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
17
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
18
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
19
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
20
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात

साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:40 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवसाची सुरुवात योगासनाने होते. ते रोज साधारणपणे 40 मिनिटांपर्यंत योग करतात. पंतप्रधान मोदी यांचा दिवस सूर्य नमस्कार आणि प्राणायाम केल्याशिवाय सुरू होत नाही.

पंतप्रधाननरेंद्र मोदी आज त्यांचा 74 वा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्या 74 व्या वर्षीही ते अत्यंत फिट आणि निरोगी आहेत. योगाभ्यास आणि संतुलित आहार हाच आपल्या निरोगी जीवनाचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी अनेक वेळा म्हटले आहे. तर जाणून घेऊयात कशी आहे, पंतप्रधान मोदींची दैनंदिन दिनचर्या...

पंतप्रदान नरेंद्र मोदी स्वतःला फिट ठेवण्यासाठी वज्रासन, सेतुबंधासन, भुजंगासन आणि उत्तानपादासन आदी योगासने करतात. महत्वाचे म्हणजे, ते रोज केवळ साडेतीन तासच झोपतात. तसेच ते सायंकाळी सहा वाजल्यानंतर, काहीही खात नाहीत.

यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री एल. मुरुगन एकदा म्हणाले होते की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोजच्या दिनचर्येने अत्यंत प्रभावित झाले आहेत. मोदी रोज केवळ साडेतीन तास झोपतात आणि सायंकाळी सहानंतर काहीही खात नाहीत. ते नेहमी साधा आणि संतुलित आहार घेतात. ते साधारणपणे डाळ, भात, खिचडी असे पदार्थ घेणे पसंत करतात.

योगाने होते दिवसाची सुरुवात -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवसाची सुरुवात योगासनाने होते. ते रोज साधारणपणे 40 मिनिटांपर्यंत योग करतात. पंतप्रधान मोदी यांचा दिवस सूर्य नमस्कार आणि प्राणायाम केल्याशिवाय सुरू होत नाही. ते आठवड्यातून दोन वेळा योग निद्रा करतात. एकदा ते स्वतःच म्हणाले होते की, झोप न येण्याचा त्रास टाळण्यासाठी योगनिद्रा अत्यंत उपयुक्त आहे.

हलका नाश्ता आणि सायंकाळी 6 नंतर जेवण नाही -पंतप्रधान मोदी शाकाहारी आहेत. ते अनेक वेळा उपवासही करतात. ते सहसा सकाळी नऊच्या सुमारास नाश्ता करतात. एकदा फिट इंडियाशी संबंधित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले होते की, त्यांना शेवग्याच्या शेंगाचे पराठे खूप आवडतात. त्यात मुबलक प्रमाणात पोषक तत्व असतात. अशा प्रकारचे पराठे दे आठवड्यातून दोन वेळा नक्की खातात. त्याचे रात्रीचे जेवणही अत्यंत साधे असते. यात मुख्याने गुजराती खिचडीचा समावेश असतो. सायंकाळी सहानंतर ते काहीही खात नाहीत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधानHealthआरोग्यLifestyleलाइफस्टाइल