शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार, लष्करी तयारीचा आढावाही घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 8:29 AM

PM Narendra Modi to celebrate Diwali with Army jawans : नरेंद्र मोदी राजौरीमध्ये तीन ते चार तास थांबण्याची शक्यता आहे. यादरम्यान ते जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लष्करी तयारीचा आढावाही घेणार आहेत.

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यंदाची दिवाळी (Diwali) जवानांसोबत साजरी करणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरामध्ये एलओसीच्या फॉरवर्ड पोस्टवर जवानांसोबत नरेंद्र मोदी दिवाळी साजरी करणार आहेत. 2019 मध्येही नरेंद्र मोदी यांनी राजौरीमध्ये दिवाळी साजरी करून जवानांचे मनोबल वाढवले ​​होते. यंदाची दिवाळी म्हणजेच आज (गुरुवार) नरेंद्र मोदींचा एलओसीच्या नौशेरा सेक्टरमध्ये दौरा प्रस्तावित आहे. दरम्यान, राजौरी-पुंछ सीमा भागात दहशतवाद्यांविरोधात तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता नौशेरा येथे पोहोचणार आहेत. पहिल्यांदा ते जम्मू विमानतळावर येतील, तेथून ते नौशेराकडे रवाना होतील. नरेंद्र मोदी राजौरीमध्ये तीन ते चार तास थांबण्याची शक्यता आहे. यादरम्यान ते जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लष्करी तयारीचा आढावाही घेणार आहेत. याशिवाय सुरक्षेसंदर्भात बैठकही प्रस्तावित आहे.

मोदींनी याआधीही जवानांसोबत केलीय दिवाळी साजरीपंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी चौथ्यांदा जम्मू-काश्मीर आणि लडाख सीमेवर दिवाळी साजरी करणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2014 मध्ये सियाचीनला भेट दिली होती. येथे दिवाळी साजरी केल्यानंतर ते श्रीनगरलाही गेले. 2017 मध्ये त्यांनी काश्मीरमधील बांदीपोरा येथे लष्कर आणि बीएसएफच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. 2019 मध्ये ते राजोरीच्या इन्फंट्री डिव्हिजनमध्ये गेले होते, जिथे त्यांनी लष्करातील जवानांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला होता. तसेच 2020 मध्ये नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील जैसलमेर येथे असलेल्या लोंगावाला सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

दौऱ्याबाबत सुरक्षा दलांना सतर्क राजोरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या घनदाट जंगलात तीन आठवड्यांपासून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याबाबत सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. 11 ऑक्टोबर रोजी चामरेड जंगलात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जेसीओसह पाच जवान शहीद झाले होते. यानंतर, मेंढार येथील भटादुडिया येथे दुसरा हल्ला झाला, ज्यात जेसीओसह चार जवान शहीद झाले. आतापर्यंत हा हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याचा शोध लागलेला नाही.

नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा!पंतप्रधान मोदींनी ट्विट करत देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "दिवाळीच्या या पवित्र वेळी देशवासीयांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा! माझी इच्छा आहे की, प्रकाशाचे हे पर्व तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख, संपन्नता आणि सौभाग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा! Wishing everyone a very Happy Diwali." असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरDiwaliदिवाळी 2021Indian Armyभारतीय जवान