PM Narendra Modi : 'काँग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण...' PM मोदींचा विरोधकांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 02:53 PM2023-03-12T14:53:59+5:302023-03-12T14:55:01+5:30

PM Narendra Modi : पीएम मोदी रविवारी कर्नाटक दौऱ्यावर आले, यावेळी त्यांनी हजारो कोटींच्या योजनांचे लोकार्पण केले. तसेच, काँग्रेसवर जोरदार टीकाही केली.

PM Narendra Modi: 'Congress is dreaming of digging Modi's grave, but...' PM Modi attacks congress | PM Narendra Modi : 'काँग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण...' PM मोदींचा विरोधकांवर घणाघात

PM Narendra Modi : 'काँग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण...' PM मोदींचा विरोधकांवर घणाघात

googlenewsNext

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी(दि.12) कर्नाटकच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या वर्षातील त्यांचा हा सहावा राज्य दौरा आहे. रविवारी कर्नाटकात पोहोचल्यानंतर त्यांनी मांड्यात जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. 

'ते मोदीची कबर खोदण्यात अन् मोदी...'
यावेळी पीएम मोदी म्हणाले की, 'काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण मोदी बंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे बांधण्यात व्यस्त आहे. काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात आणि मोदी गरिबांचे जीवन सुखकर करण्यात व्यस्त आहेत. देशाच्या करोडो माता-भगिनींचे आशीर्वाद मोदींचे सर्वात मोठी सुरक्षा कवच आहे, हे मोदींची कबर खोदण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसवाल्यांना माहीत नाही.'

'काँग्रेसने देश लुटला'
पीएम मोदी पुढे म्हणतात, '2014 पूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्या काळात त्यांनी गरीबाला उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. गरिबांच्या विकासासाठी असलेला हजारो कोटींचा पैसा काँग्रेस सरकारने लुटला. काँग्रेसने गरिबांच्या दुःखाचा कधीच विचार नाही केला. उलट, शेतकऱ्यांच्या छोट्या-छोट्या अडचणी दूर करुन भाजप त्यांचे प्रश्न सोडवत आहे. मांड्यातील 2.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे पाठवण्यात आले आहेत,' असेही मोदी यावेळी म्हणाले.

'रिबांचे जीवन सुसह्य केले'
आपल्या सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना पीएम मोदी म्हणाले, 'गेल्या 9 वर्षात भाजप सरकारच्या योजनांमुळे करोडो गरिबांचे जीवन सोपे झाले आहे. काँग्रेसच्या राजवटीत गरिबांना सुविधांसाठी सरकारच्या चकरा माराव्या लागत होत्या. आपल्या देशात अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्पही वेगाने पूर्ण जात आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने अप्पर भद्रा प्रकल्पासाठी 5,300 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. यामुळे कर्नाटकातील मोठ्या भागातील सिंचनाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत. आम्ही ठरवले आहे की, उसापासून बनवलेल्या इथेनॉलचे उत्पादन वाढवायचे आहे. म्हणजेच जास्त उत्पादन झाल्यास उसापासून इथेनॉल बनवले जाईल. इथेनॉलपासून शेतकऱ्याची चांगली कमाई होईल.'

'प्रेमाची परतफेड व्याजासह'
मांड्याला पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वागत केले. मांड्यात मोदींचा मोठा रोड शो झाला. यावेळी लोकांची मोठी गर्दी दिसली आणि त्यांनी पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी येथे कोट्यवधी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. पीएम मोदी म्हणाले की, आज म्हैसूर-कुशालनगर 4 लेन महामार्गाची पायाभरणीही झाली, हे सर्व प्रकल्प विकासाच्या मार्गाला नवी दिशा देतील. तुमच्या प्रेमाची व्याजासह परतफेड करण्याचा डबल इंजिन सरकारचा प्रयत्न असून, आज ज्या प्रकल्पाची पायाभरणी झाली आहे, तो त्याचाच एक भाग असल्याचे ते म्हणाले.

Web Title: PM Narendra Modi: 'Congress is dreaming of digging Modi's grave, but...' PM Modi attacks congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.