नवी दिल्ली - नरेंद्र मोदी पंतप्रधान (PM Narendra Modi) झाल्यापासून त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मोदी काय खातात, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट कोण सांभाळतं? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. पंतप्रधान मोदींबद्दल काही प्रश्न माहिती अधिकार अर्जातून विचारण्यात आले होते. त्या अर्जाला माहिती अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे. याबाबत जाणून घेऊया...
आरटीआयमध्ये पंतप्रधान मोदींच्या जेवणावर होणाऱ्या खर्चाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं आहे. मोदी त्यांच्या जेवणाचा खर्च स्वत:च उचलतात. त्यांच्या जेवणावर सरकार कोणताही खर्च करत नाही, असं उत्तर आरटीआयमधून मिळालं. मोदींना गुजराती जेवण आवडतं. त्यांना आचारी बद्री मीणा यांनी केलेला स्वयंपाक आवडतो. बाजरीची रोटी आणि खिचडी मोदींना सर्वाधिक आवडते.
मोदींनी घेतलेल्या सुट्ट्यांची माहिती मागण्यात आली होती. त्यावर मोदींनी आतापर्यंत एकही सुट्टी घेतली नसल्याची माहिती पीएमओने दिली. मोदी किती तास काम करतात, असा प्रश्न एका आरटीआयमधून विचारण्यात आला. त्यावर मोदी प्रत्येक वेळी ड्युटीवरच असतात, असं उत्तर दिलं. पीएमओमधील इंटरनेटचा स्पीड किती असा प्रश्न 2015 मध्ये एका आरटीआयमधून विचारला गेला. त्याला 34 एमबीपीएस असं उत्तर देण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.