शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

PM नरेंद्र मोदींनी घेतले द्वारका शहराचे दर्शन; फोटो शेअर करत म्हणाले- 'हा दिव्य अनुभव...'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 2:25 PM

पीएम मोदी गुजरातच्या दौऱ्यावर असून, त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या काळात समुद्रात बुडालेल्या द्वारका शहराचे दर्शन घेतले.

PM Narendra Modi Dwarka : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी द्वारका येथील 'सुदर्शन सेतू'चे उद्घाटन केले. 2017 मध्ये त्यांनीच या पुलाची पायाभरणी केली होती. हा पूल ओखी ते बेट द्वारकाला जोडेल. विशेष म्हणजे, उद्घाटनानंतर पीएम मोदींनी समुद्रात स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला. यावेळी पंतप्रधान मोदींनी समुद्रात बुडालेल्या 'द्वारका' शहराचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. 

पीएम मोदींनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले की, 'समुद्रात बुडालेल्या द्वारका शहरात प्रार्थना करणे, हा एक दिव्य अनुभव होता. यामुळे मी अध्यात्मिक वैभव आणि शाश्वत भक्तीच्या प्राचीन युगाशी जोडला गेलो. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांचे कल्याण करोत.' विशेष म्हणजे, पाण्याखालील द्वारकेत गेल्यावर भगवान श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी त्यांनी मोराची पिसे सोबत नेली होती.

मोदींच्या हस्ते पुलाचे उद्घाटनआज सकाळी पंतप्रधान मोदींनी बेट द्वारका येथील मंदिराला भेट दिली आणि दर्शन घेतल्यानंतर ओखा ते बेट द्वारका बेटाला जोडणाऱ्या 2.32 किमी लांबीच्या सागरी सेतू सुदर्शन पुलाचे उद्घाटन केले. हा देशातील सर्वात लांब केबल पूल आहे, ज्याची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी 2017 मध्ये केली होती. 900 कोटींहून अधिक खर्च करून हा पूल पूर्ण झाला आहे.

लक्षद्वीपनंत द्वारकेचे पर्यटन वाढणारपीएम मोदींनी यावर्षी जानेवारी महिन्यात लक्षद्वीपला भेट दिली होती. येथे त्यांनी स्नॉर्कलिंगचा आनंद लुटला आणि त्याचे फोटोही शेअर केले होते. तसेच, देशवासीयांना सुट्टी घालवण्यासाठी येथे येण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंत लक्षद्वीपच्या पर्यटनात वाढ झाली आहे. आता त्यांनी द्वारकेचे फोटो शेअर केल्यामुळे द्वारकेच्या पर्यटनात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातTempleमंदिरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा