शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

मोदी सरकार UPA सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर 'श्वेतपत्रिका' आणणार! जाणून घ्या संसदेत केव्हा सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 7:19 PM

Parliament Budget Session 2024: ही श्वेतपत्रिका शुक्रवारी अर्थात 9 फेब्रुवारीला अथवा शनिवारी  म्हणजेच 10 फेब्रुवारीला सभागृहात सादर केली जाऊ शकते.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या (2004-2014) 10 वर्षांच्या कार्यकाळातील आर्थिक गैरव्यवस्थापनासंदर्भात संसदेत श्वेतपत्रिका आणणार आहे. ही श्वेतपत्रिका शुक्रवारी अर्थात 9 फेब्रुवारीला अथवा शनिवारी  म्हणजेच 10 फेब्रुवारीला सभागृहात सादर केली जाऊ शकते.

या श्वेतपत्रिकेत आर्थिक गैरव्यवस्थापनाशिवाय यूपीए सरकारच्या कार्यकाळात उचलल्या जाऊ शकणाऱ्या सकारात्मक पावलांच्या परिणामांसंदर्भातही चर्चा केली जाईल. एवढेच नाही, तर या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून भारताची आर्थिक दुर्दशा आणि अर्थव्यवस्थेवर पडलेला नकारात्मक प्रभवही सविस्तरपणे समोर समोर ठेवला जाईल.

काय म्हणाल्या होत्या निर्मला सीतारामन? -तत्पूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा तात्पुरता अर्थसंकल्प नुकताच सादर केला.  यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षांतील कामाचा लेखाजोखा मांडला आणि विविध बाबतीत त्याची तुलना यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाशी केली. यूपीए सरकारच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे कसे गैरव्यवस्थापन झाले, यावर श्वेतपत्रिका मांडणार असल्याचेही निर्मला सीतारामन यांनी तेव्हा जाहीर केले होते.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार 2014मध्ये सत्तेवर आले. त्यापूर्वीच्या 10 वर्षांच्या काळात काय झाले आणि त्यातून काय धडे घ्यायला हवे, हे सांगण्यासाठी श्वेतपत्रिका काढणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या होत्या. एवढेच नाही तर, माेदी सरकार स्थापन झाले त्यावेळी अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्याने सुधारणे आणि शासन व्यवस्थेची घडी नीट बसविण्याची माेठी जबाबदारी सरकारवर हाेती. लाेकांना आशा देणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि अतिशय आवश्यक असलेल्या सुधारणांसाठी समर्थन उभे करणे, ही त्यावेळी काळाची गरज हाेती. ‘देश प्रथम’ या तत्त्वावर विश्वास ठेवून सरकारने हे कार्य यशस्वीपणे पार पाडले. सरकारसमाेरील संकटांवर मात करून, सर्वांगीण विकास साधण्यासाठी अर्थव्यवस्थेला सातत्यशील विकासाच्या मार्गावर आणण्यात आले आहे, असे सीतारामन यांनी म्हटले होते.

महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा -सोमावारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, ''युक्रेन आणि गाझामध्ये युद्ध सुरू असूनही देशातील महागाई नियंत्रणात आहे. देशातील महागाईवर दोन गाणी सुपर हिट झाले. एक ‘महंगाई मार गई’ आणि दुसरे ‘महंगाई डायन खाए जात है’. हे दोन्ही गाणी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळा आली आहेत.’’

महत्वाचे म्हणजे, या वेळचे संसदेतील अर्थसंकल्पिय अधिवेशन अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. कारण हे या वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचे अखेरचे अधिवेश  आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसParliamentसंसदBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन