काही दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली होती, आता ही यात्रा जम्मू काश्मिरमध्ये पोहोचली आहे. आज श्रीनगर येथे ही यात्रा संपली. मोठ्या पावसातही राहुल गांधींनी तिरंगा फडकवला आणि आपल्या समारोपाचे भाषण केले. 'आमची ही यात्रा द्वेषाच्या वातावरणात प्रेमासाठी केलेला छोटासा प्रयत्न आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यात काश्मीरमध्ये अशा प्रकारे फिरण्याची हिंमत नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. या विधानावर भाजपने आता राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी आता ही यात्रा काढत आहेत, तर भाजपने 1991 मध्ये मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली लालचौक येथे तिरंगा फडकावला होता, याचे सूत्रसंचालन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते, असं प्रत्युत्तर ठाकूर यांनी दिले.
भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनीही काँग्रेसवर टीका केली आहे. या यात्रेत काँग्रेसने बीफ पार्टी करणाऱ्यांना सामील करुन घेतले. या यात्रेत अपयशी नेत्यांनी कमल हसन यांना एक मुलाखत दिली आहे. काँग्रेसची ही यात्रा पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असा हल्लाबोल सुधांशु त्रिवेदी यांनी केला.
खिशाला परवडणाऱ्या किंमतीत आली नवी कोरी E-Bike; फुल चार्जमध्ये १३० किमी धावणार
'हिंमत असेल तर माझा पांढरा टी-शर्ट लाल दाखवा'
या यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. 'मी जम्मू-काश्मीरला भेटीसाठी पोहोचलो तेव्हा मला सांगण्यात आले की सुरक्षेला धोका आहे. पण मी असेच चालणार असे स्पष्टपणे सांगितले. मी फक्त टी-शर्ट घालून बाहेर पडलो आणि त्या लोकांना माझ्या पांढऱ्या टी-शर्टचा रंग लाल दाखवा असे आव्हान दिले. मला अनेक धमक्या दिल्या, मात्र जम्मू-काश्मीरच्या जनतेने मला मनापासून प्रेम दिले. जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार मी समजू शकतो, असंही राहुल गांधी म्हणाले.