नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चला संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. यानंतर आज (सोमवार) त्यांनी लॉकडाउनच्या परिणामांची समिक्षा करण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने बैठक केली. या बैठकीत 14 एप्रिल ते तीन मेपर्यंत सुरू असलेल्या लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यातील कोरोना संक्रमणाची स्थिती आणि टप्प्या-टप्प्याने लॉकडाउन काढण्याच्या उपायांवर चर्चा झाली. यावेळी गृह मंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, तसेच पंतप्रधान कार्यालयातील आणि इतर संबंधित मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
या बैठकीत, महाराष्ट्राचेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी, मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेन्द्र सिंह रावत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला होता.
अर्थव्यवस्था लवकरात लवकर पटरीवर आणण्यासाठी पावले उचलणे आवश्यक -उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले, अर्थव्यवस्थेसंदर्भात लवकरात लवकर उपाय योजना आखण्याची आवश्यकता आहे. उद्योग व्यापार टप्प्या-टप्प्याने सुरू करणे आश्यक आहे. मात्र, हे सर्व करताना सावधगिरी बाळगणेही तेवढेच आवश्यक आहे. तसेच उत्पन्न झालेल्या परिस्थितीत लोकांना सहजतेने सुविधा उपलब्ध होतील. यादृष्टीनेही योजना तयार करावी लागेल. पुढील वाटचालीसाठी अर्थव्यवस्था लवकरात लवकर पट्रीवर येणे आवश्यक आहे.
याला म्हणतात 'हटके लग्न'! पुढे-मागे पोलीस अन् मधे 'नवरदेव-नवरी', अशी करण्यात आली पाठवणी
काय म्हणाले गुजरातचे मुख्यमंत्री? या राज्यात झाली चार कोटी लोकांची स्क्रीनिंगयावेळी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, राज्यात पोलिओ अभियानाप्रमाणे डोअर टू डोअर स्क्रीनिंग करण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास चार कोटी लोकांची स्क्रीनिंग करण्यात आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, लॉकडाउन वाढविण्यासंदर्भात राज्य केंद्राच्या निर्णयाचे पालन करेल. केंद्राने देश हितासाठी यावर निर्णय घ्यायला हवा. आम्हाला 3 मेनंतरही लॉकडाउन वाढविण्याची आवश्यकता वाटते. मात्र, याच वेळी परिस्थितीही टप्प्या-टप्प्याने सर्वसामान्य करायची आहे. यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी, आणखी काही दिवस राज्यातील लॉकडाऊन सुरू ठेवण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही राज्यातील लॉकडाउन सुरूच ठेवण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याचवेळी, राज्यात आर्थिक कामकाज सुरू केले जाऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
लयभारी! डोनाल्ड ट्रम्प, जेव्हा स्वतःचीच स्तुती करतात...; विरोधकांवर 'असा' साधला निशाणा
कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी हरियाणा तयार -बैठकीत, कोरोनामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी हरियाणा पूर्ण पणे तयार असल्याचे मुख्यमंत्री खट्टर यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी कोरोनाग्रस्थांसाठी राज्यात करण्यात आलेल्या व्यवस्थेसंदर्भातही माहिती दिली.
मेघालयाने केली लॉकडाउन वाढविण्याची मागणी -मेघायलयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी राज्यात 3 मेनंतरही लॉकडाउन सुरूच ठेवण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी, मेघालयातील ग्रीन झोन जिल्ह्यांमध्ये 3 मेनंतर काही प्रमाणात सूट द्यावी. मात्र, राज्याच्या इतर भागांत लॉकडाउन सुरूच ठेवावे, असे म्हटले आहे.
यावेळी सीमेवरील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी, आंतरराष्ट्रीय सीमेवर काटेकोरपणे लक्ष देण्यात यावे, असा सल्लाही पंतप्रधानांना दिला. यावेळी पंतप्रधान मोदींनी, कोरोनाला रोखल्याबद्दल सिक्किमची प्रशंसा केल्याचेही समजते.
किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 27,892 वर -देशात गेल्या 24 तासांत 1,396 नवे रुग्ण आढळून आले असून 381 लोक ठणठणीत बरे झाले आहेत. याबरोबरच आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 27,892 वर पोहोचली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेटही वाढला असून तो 22.17 वर पोहोचला आहे.
85 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांत एकही रुग्ण नाही -देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 16 जिल्ह्यांमध्ये गेल्या 28 दिवसांत एकही कोरोनाबाधित आढळून आला नाही. तर 85 जिल्हे असे आहेत, जेथे गेल्या 14 दिवसांत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही.