शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल जीत लिया मोदी जी! स्वतःच छत्री घेऊन संसदेत पोहोचले PM मोदी; PHOTO व्हायरल, होतेय जबरदस्त चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 17:38 IST

जोरदार पाऊस सुरू असतानाही मोदी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी स्वतःची छत्री स्वतःच पकडलेली होती. काही मंत्रीही यावेळी मोदींसोबत उभे होते. मोदींचे यावेळचे फोटो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत आणि यावर लोकांमध्ये जबरदस्त चर्चाही सुरू आहे.

नवी दिल्ली -संसदेच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात मोदी सरकार कोण कोणती विधेयकं मंजूर करून घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तसच, यावेळी विरोधकही करोना व्यवस्थापन, इंधन दरवाढ आणि कृषी विधेयकांच्या मुद्यांवर आक्रमक असतील. तत्पूर्वी, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, यावेळी जोरदार पाऊस सुरू असतानाही ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी स्वतःची छत्री स्वतःच पकडलेली होती. काही मंत्रीही यावेळी मोदींसोबत उभे होते. मोदींचे यावेळचे फोटो सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत आणि यावर लोकांमध्ये जबरदस्त चर्चाही सुरू आहे. (PM Narendra Modi holds umbrella pictures ahead of monsoon session going viral on social media)

या फोटो संदर्भात, भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत लिहिले आहे, साधे जीवन आणि उच्च विचार प्रकट करताना देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी. हा फोटो आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वीचा आहे. जेव्हा ते पत्रकारांसोबत बोलत होते. 

एका युझरने यासंदर्भात कमेंट करताना म्हटले आहे, पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदी माध्यमांशी संवाद साधताना. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या पंतप्रधानांचे पावसात स्वतःच छत्र पकडून उभे राहणे त्यांचे सरळ व्यक्तिमत्व दर्शवते.

पत्रकारांशी बोलताना काय म्हणाले मोदी -कोरोनाच्या महासाथीचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत आहे. संसदेत या महासाथीच्या संबंधात चर्चा केली जावी. खासदारांकडून सर्व सूचनाही मिळाव्यात, जेणेकरून या महासाथीचा सामना करण्यासाठी आपल्या लढाईला अधिक बळकट करता येईल आणि कमतरताही दूर केल्या जातील, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

परखड प्रश्न विचारा, पण सरकारलाही उत्तर देण्याची संधी द्या - या सभागृहात चर्चा केली गेली पाहिजे. देशाच्या जनतेला उत्तरं हवी आहेत. ती उत्तरं देण्याची सरकारची तयारी आहे. मी सर्व खासदार आणि राजकीय पक्षांना विनंती करतो की त्यांनी परखड  प्रश्न विचारावेत, परंतु सरकारलाही शांत वातावरणात उत्तर देण्याची संधीही द्यावी, असही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

एका युझरने पंतप्रधान मोदींचा यावेळचा फोटो शेअर करत 'मन जिंकले मोदी जी' असे लिहिले आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदBJPभाजपाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन