शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 14:39 IST

'काँग्रेस-एनसी-पीडीपीने राज्यात फूटीचे राजकारण केले होते. पण भाजप सर्वांना जोडत आहे.'

PM Narendra Modi in J&K :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी(दि.19) श्रीनगरमध्ये आपल्या पहिल्या निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'काल येथे पहिल्या टप्प्यातील मतदान झाले, ज्यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. पहिल्यांदाच राज्यात दहशतीच्या सावलीशिवाय मतदान झाले. काश्मीरच्या विध्वंसाला तीन घराणे जबाबदार आहेत, मात्र आता राज्य या घराणेशाहीच्या तावडीत राहणार नाही,' असं पीएम मोदी म्हणाले.

'कालच 7 जिल्ह्यांमध्ये पहिल्या फेरीचे मतदान झाले. पहिल्यांदाच दहशतीच्या सावलीशिवाय हे मतदान झाले. एवढ्या मोठ्या संख्येने लोक मतदानासाठी घराबाहेर पडले ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मतदानासाठी लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले. सर्वांनीही मोकळ्या मनाने मतदान केले. अनेक जागांवर मतदानाचे विक्रम मोडले. किश्तवाडमध्ये 80% पेक्षा जास्त, डोडा जिल्ह्यात 71% पेक्षा जास्त मतदान, रामबनमध्ये 70% पेक्षा जास्त आणि कुलगाममध्ये 62% पेक्षा जास्त मतदान झाले. अनेक जागांवर गतवेळचे मतदानाचे विक्रम मोडले.' 

विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार : पंतप्रधान मोदीमोदी पुढे म्हणतात, 'काँग्रेस-एनसी-पीडीपीने राज्यात फूटीचे राजकारण केले होते. पण भाजप सर्वांना जोडत आहे. काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार आहेत. या तिन्ही कुटुंबांना वाटते की, त्यांच्यावर कुणी प्रश्न उपस्थित करू शकतत नाही. खुर्चीवर बसून तुम्हाला जनतेला लुटायचे आहे. तुमचा न्याय्य हक्क हिरावून घेणे हे या लोकांचे काम आहे. त्यांनी जम्मू आणि काश्मीरला फक्त अराजकता दिली. पण आता जम्मू-काश्मीर या तीन राजघराण्यांच्या ताब्यात राहणार नाही.'

दुसरी पिढी वाया जाऊ देणार नाही: पंतप्रधान मोदी'जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्त करणे, जम्मू-काश्मीरविरुद्ध कट करणाऱ्या प्रत्येक शक्तीला पराभूत करणे आणि येथील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. या तीन कुटुंबांकडून दुसरी पिढी नष्ट करू देणार नाही. येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरळीत सुरू आहेत. मुलांच्या हातात पेन, वह्या, लॅपटॉप असतात. आज राज्यात नवीन शाळा, नवीन महाविद्यालये, एम्स, वैद्यकीय महाविद्यालये, आयआयटी बांधल्याच्या बातम्या येतात,' असेही मोदी यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसBJPभाजपा