शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल; PM मोदींना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 6:15 PM

'आज देशात ज्या वेगाने काम सुरू आहे, काँग्रेस या गतीची कल्पनाही करू शकत नाही. त्यांना एवढी कामे करायला 100 वर्षे लागली असती.'

PM Narendra Modi in LokSabha: लोकसभेत शुक्रवारी(दि.5) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.

'अब की बार 400 पार'पंतप्रधान मोदी म्हणाले की, 10 वर्षांच्या शासनाचा अनुभव, आजची मजबूत अर्थव्यवस्था आणि भारत ज्या वेगाने प्रगती करतोय, ते पाहता मी विश्वासाने सांगतो की, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल. ही मोदींची गॅरेंटी आहे. आमची तिसरी टर्म मोठ्या निर्णयांनी भरलेली असेल. मी राममंदिर सोहळ्यात सांगितले होते की, मला पुढील हजार वर्षे देशाला समृद्धीच्या शिखरावर पाहायचे आहे. तिसरी टर्म पुढील 1000 वर्षांसाठी मजबूत पाया घालण्याची असतील. संपूर्ण देश म्हणत आहे, यावेळी 400 पार. जनता भाजपला 370 जागा आणि एनडीएला 400 जागा देईल.

काँग्रेसच्या वेगाने 100 वर्षे लागली असतीआमच्या सरकारने शेकडो कायदे रद्द केले, अमृत ​​भारत आणि नमो भारत ट्रेनने भारत प्रगतीच्या मार्गावर आला. प्रभू रामाचे मंदिर भारताच्या महान सांस्कृतिक परंपरेला ऊर्जा देत राहील. विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडण्यात ते (विरोधक) अपयशी ठरले.  आज देशात ज्या वेगाने काम सुरू आहे, काँग्रेस सरकार या गतीची कल्पनाही करू शकत नाही. आम्ही गरीबांसाठी 4 कोटी घरे आणि शहरी गरिबांसाठी 80 लाख पक्की घरे बांधली. काँग्रेसच्या गतीने ही घरे बांधली असती, तर एवढे काम पूर्ण व्हायला 100 वर्षे लागली असती.

सरकारने अनेक योजना सुरू केल्याकरप्रणाली सुलभ करण्यासाठी जीएसटीसारखे निर्णय घेण्यात आले. जनतेने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा जास्त आशीर्वाद दिले. दुसरी टर्म म्हणजे आश्वासनांच्या पूर्ततेची मुदत होती. देशाच्या ताकदीवर आमचा विश्वास आहे. आमचा लोकांच्या शक्तीवर विश्वास आहे. देशातील जनतेने आम्हाला पहिल्यांदा सेवेची संधी दिली, तेव्हा आम्ही यूपीएने केलेली पोकळी भरुन काढली. दुसऱ्या टर्ममध्ये नव्या भारताचा पाया रचला. उज्ज्वला, आयुष्मानसह अनेक योजना सुरू केल्या. महिला शक्ती, युवा शक्ती, देशातील गरीब बंधू-भगिनी आणि शेतकरी, ज्यामुळे विकसित भारताचे ध्येय पूर्ण होईल, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.

विरोधकांनी धैर्य गमावलेमी पाहतो की तुमच्यातील अनेक लोकांनी निवडणूक लढवण्याचे धैर्य गमावले आहेत. मी ऐकले आहे की, अनेक लोक त्यांच्या जागा बदलण्याचा विचार करत आहेत. अनेकांना आता लोकसभेऐवजी राज्यसभेवर जायचे आहे. विरोधकांच्या या अवस्थेला काँग्रेस जबाबदार आहे. देशाला निरोगी आणि चांगल्या विरोधी पक्षाची नितांत गरज आहे. काँग्रेसमध्ये इतर कोणत्याही नेत्याचा प्रचार झाला नाही. देशाला घराणेशाहीचा फटका बसला आहे. काँग्रेसच्या दुकानाला टाळे लावण्याची वेळ आली. काँग्रेसच्या याच मानसिकतेमुळे देशाचे खूप नुकसान झाले आहे. काँग्रेसने नेहमीच एकाच कुटुंबावर विश्वास ठेवला आहे. त्यांनी आपल्या कुटुंबासमोर कुणाचाही विचार केला नाही, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणcongressकाँग्रेस