शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नोएडात आशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:27 AM

या विमानतळामुळे 1 लाख रोजगारांची निर्मिती होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज दुपारी 1 वाजता उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरच्या जेवार येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी करणार आहेत. यानंतर 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे उत्तर प्रदेश देशातील पहिले राज्य ठरणार आहे. हे विमानतळ दिल्ली-एनसीआरमधील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल आणि त्याच्या बांधकामानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दबावही कमी होईल.

आशियातील सर्वात मोठे विमानतळहे नवीन विमानतळ यूपीच्या औद्योगिक, आर्थिक आणि पर्यटन विकासासाठी मैलाचा दगड ठरेल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विमानतळाच्या पायाभरणीचा पहिला टप्पा 2023-24 मध्ये पूर्ण होईल. जेवार विमानतळ हे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील औद्योगिक उपक्रम आणि सेवा क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनेल. पहिला टप्पा 10,050 कोटी रुपये खर्चून विकसित केला जात आहे. 6200 हेक्टरमध्ये हे आशियातील सर्वात मोठे विमानतळ असेल. पहिल्या टप्प्यात 1334 हेक्टरमध्ये दोन धावपट्टी बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 1.2 कोटी प्रवासी प्रवास करतील. विमानतळावर मालवाहतुकीच्या सुविधेशिवाय एमआरओ यंत्रणाही असणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर विमानतळाची वार्षिक क्षमता 1.2 कोटी प्रवासी असेल.

कार्गो टर्मिनलची क्षमता 20 लाखहे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे विमानतळ असेल, असा योगी सरकारचा दावा आहे. विमानतळ पूर्णपणे प्रदूषणमुक्त असेल. इतकेच नाही तर एकात्मिक मल्टी-मॉडल कार्गो सेंटर असलेले हे भारतातील पहिले विमानतळ असेल आणि तेथून लॉजिस्टिक खर्च आणि वेळ कमी करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले जाईल. या विमानतळावर बांधण्यात येणाऱ्या कार्गो टर्मिनलची क्षमता 20 लाख मेट्रिक टन असेल. त्यात वाढ करून 80 लाख मेट्रिक टन करण्यात येणार आहे.

विमानतळावर अतिशय आधुनिक सुविधा असतील

विमानतळावर ग्राउंड ट्रान्सपोर्टेशन सेंटर विकसित केले जाईल, ज्यामध्ये मल्टी-मॉडल ट्रान्झिट सेंटर असेल. मेट्रो आणि हायस्पीड रेल्वे स्थानके असतील. याशिवाय टॅक्सी, बस सेवा आणि खाजगी वाहन पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल. अशा प्रकारे विमानतळ रस्ते, रेल्वे आणि मेट्रोने थेट जोडले जाऊ शकणार आहे. एवढेच नाही तर जवळपासचे सर्व प्रमुख मार्ग आणि महामार्ग जसे की यमुना एक्सप्रेसवे, वेस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे आणि इतर देखील विमानतळाशी जोडले जातील. विमानतळाला प्रस्तावित दिल्ली-वाराणसी हायस्पीड रेल्वेने जोडण्याची योजना आहे, ज्यामुळे दिल्ली आणि विमानतळादरम्यानचा प्रवासाचा वेळ 21 मिनिटांपर्यंत कमी होईल.

एक लाख रोजगाराची निर्मितीकेंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, हे विमानतळ केवळ उत्तर प्रदेशचा नाही तर संपूर्ण भारताचे ड्रीम प्रोजेक्ट आहे. जेवारमध्ये बांधण्यात येणारा विमानतळ विकासाचा मार्ग खुला करेल. या प्रकल्पात 2 अब्ज डॉलरची गुंतवणूक आली आहे. जेवार आणि आसपासच्या भागात 60 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा अंदाज आहे. जेवर विमानतळावरून विविध माध्यमातून 1 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांपर्यंत उत्तर प्रदेशात फक्त 2 विमानतळ होते. पण आता पंतप्रधान मोदी आल्यापासून गेल्या 7 वर्षात उत्तर प्रदेशात 9 विमानतळे झाले आहेत. जेवार येथे बांधण्यात येणारे विमानतळ हे 10वे विमानतळ असेल. पुढील 5 वर्षांत आम्ही यूपीमधील 10 ते 17 विमानतळांपर्यंत पोहोचू.

टॅग्स :AirportविमानतळNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे