आशियातील सर्वांत मोठ्या सौर प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 03:36 AM2020-07-11T03:36:45+5:302020-07-11T03:38:11+5:30

भारत आता जगातील पाचवा मोठा सौरऊर्जा उत्पादक देश बनला आहे. भारत हा स्वच्छ ऊर्जेची जागतिक बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे.

PM Narendra Modi inaugurates Asia's largest solar project in Madhya Paradesh | आशियातील सर्वांत मोठ्या सौर प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

आशियातील सर्वांत मोठ्या सौर प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

Next

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील रेवा येथे उभारण्यात आलेल्या आशियातील सर्वांत मोठ्या सौरऊर्जा प्रकल्पाचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या संबोधनात मोदी यांनी संबोधित केले.  ‘या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश राज्य देशातील स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जेचे सर्वांत मोठे भांडार म्हणून उदयास येईल.’

७५० मेगावॉट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करताना मोदी यांनी म्हटले की, सौरऊर्जा ही वर्तमानाचेच नव्हे, तर २१व्या शतकातील ऊर्जेचे माध्यम ठरणार आहे. कारण या माध्यमाद्वारे मिळणारी वीज खात्रीशीर, स्वच्छ आणि सुरक्षित आहे. भारत आता जगातील पाचवा मोठा सौरऊर्जा उत्पादक देश बनला आहे. भारत हा स्वच्छ ऊर्जेची जागतिक बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. रेवा प्रकल्पातून उद्योगालाच नव्हे, तर दिल्लीच्या मेट्रो रेल्वेलाही वीज मिळेल. शाजापूर, नीमच आणि छत्तरपूर येथील सौरऊर्जा प्रकल्पांचे कामही प्रगतिपथावर आहे. मोदी यांनी म्हटले की, मागील सहा वर्षांत ३६ कोटी एलईडी बल्बचे वितरण देशभरात करण्यात आले आहे. रस्त्यांवरील दिव्यांच्या स्वरूपात १ कोटी एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. हे सरकारचे मोठे पाऊल ठरले आहे. त्यातून ऊर्जेची मोठी बचत होत आहे.

रेवा प्रकल्पात २५० मेगाावॅट क्षमतेचे तीन युनिट आहेत. हा प्रकल्प ५00 हेक्टरवर पसरलेला आहे. १,५00 हेक्टरच्या सोलार पार्कच्या आत हा प्रकल्प आहे.
‘रेवा अल्ट्रा मेगा सोलार लिमिटेड’ने हा सोलार पार्क विकसित केला आहे. यात मध्य प्रदेश ऊर्जा विकास महामंडळ, सोलार एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडिया यांची भागिदारी आहे.

Web Title: PM Narendra Modi inaugurates Asia's largest solar project in Madhya Paradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.