शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

"मोदी चक्रवर्ती सम्राट, राजर्षी; 1000 वर्षात एकमेव हिंदू शासक! आमचं प्रेम भाजप नाही, तर PM अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 2:11 PM

जितेंद्रानंदजी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना चक्रवर्ती सम्राट म्हटले आहे. तसेच त्यांना राजर्षी, अशी उपाधीही दिली आहे. एवढेच नाही, तर...

अहमदाबादमध्ये संत मंडळींच्या एका सन्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जबरदस्त कौतुक करण्यात आले. पंतप्रधान नरेद्र मोदी हे गेल्या 1000 वर्षांतील एकमेव हिंदू शासक आणि चक्रवर्ती सम्राट आहेत. तसेच, आमचे प्रेम भाजपसाठी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी आहे, असे अखिल भारतीय संत समितीचे महासचिव जितेंद्रानंदजी यांनी म्हटले आहे.

जितेंद्रानंदजी म्हणाले, 'आम्ही मोदी आणि अमित शाह यांच्यावर प्रेम करतो, भाजपवर नाही. दुविधेत राहू नका. कारण भाजपमध्ये बरेच नास्तिकही आहेत, ज्यांचे धर्माशी काही घेणे-देणे नाही. आम्ही मोदी आणि शाहंवर प्रेम करतो. कारण गेल्या 1000 वर्षांत केवळ मोदीच एकमेव हिंदू शासक आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान आहे.'

जितेंद्रानंदजी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना चक्रवर्ती सम्राट म्हटले आहे. तसेच त्यांना राजर्षी, अशी उपाधीही दिली आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राजर्षि होण्याचे सर्व गूण विद्यमान आहेत. राजर्षी अशा राजाला म्हटले जाते, जो विद्वानही आहे. रामजन्मभूमी न्यासला IT डिपार्टमेन्टनं 22 नोटिस दिल्या, छापेमारी केली पण... -काँग्रेसकडून सरकारवर तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप केला जातो, यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, 'रामजन्मभूमी न्यासला टार्गेट करत इन्कम टॅक्स डिपार्टमेन्ट कडून 22 नोटिस देण्यात आल्या आणि छापेमारी करण्यात आली. मात्र चंपतराय जींनी यासंदर्भात कधी रडारड केली नाही. जसे, सध्या काँग्रेस करत आहे.' 

ज्ञानवापीमध्ये पूजेसाठी न्यायालयाने दिलेल्या परवानगी संदर्भात बोलताना ते म्हणाले, 'आम्ही अयोध्या, काशी आणि मथुरेसाठी शपथ घेतली आहे. अयोध्येत राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेनंतर, आता काशीचे ताळेही तुटले आहेत.' 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAmit Shahअमित शाहAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरGyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदcongressकाँग्रेस