पंतप्रधान मोदी क्वाड संमेलनात सहभागी होण्यासाठी जपानला रवाना होणार आहेत. या संमेलनाचं आजोजन २४ आणि २४ मे रोजी करण्यात येत आहे. मोदी जपान दौऱ्यात २३ बैठकींमध्ये सहभागी होणार आहेत. यातील तीन बैठका तीन राष्ट्राध्यक्षांसोबत देखील होणार आहेत. मोदी जवळपास ४० तास जपानमध्ये असणार आहेत. क्वाड संमेलनात मोदींसोबतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि ऑस्ट्रेलियाचे नेते अँथनी अल्बानीस देखील सहभागी होणार आहेत. पीएम मोदी इथं भारतीय वंशाच्या लोकांना आणि जपानच्या अनेक कंपन्यांच्या सीईओंसोबतही चर्चा करणार आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या काळात जपानमध्ये या परिषदेचं आयोजन होत असल्यानं यास महत्व प्राप्त झालं आहे.
"पंतप्रधान मोदी जपानमध्ये २३ मे रोजी पोहोचतील आणि बिझनेस लीडर्ससोबतच विविध कंपनींच्या सीईओंसोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधणार आहेत. तर २४ मे रोजी क्वाड परिषदेत सहभाही होतील. मोदी जपानच्या जवळपास ३५ प्रमुख बिझनेस लीडर्ससोबत भेट घेणार आहेत. यात कंपन्यांचे सीईओ, चेअरमन आणि अध्यक्षांचा समावेश असणार आहे", असं जपानमधील भारतीय दूतावासाचे राजदूत एसके वर्मा यांनी सांगितलं.
बायडन, किशीदा आणि अल्बानीस यांच्यासोबत बैठकपंतप्रधान मोदी या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि जपानच्या फुमियो किशीदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार आहेत. यासोबतच ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बानीस यांच्यासोबतही द्वीपक्षीय बैठक होणार आहे. अल्बानीस यांनी ऑस्ट्रेलियातील निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी गेल्या दशकभरापासून विराजमान असलेल्या स्कॉट मॉरिसन यांचा पराभव केला आहे.