अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत पोहोचले आहेत. विमानतळावर उतरल्यानंतर बायडेन थेट पंतप्रधानांचे निवासस्थान म्हणजेच लोककल्याण मार्गावर पोहोचले. पीएम मोदी आणि बायडेन यांच्यात पंतप्रधान निवासस्थानी बैठक सुरू आहे.
भारतात पोहचताच ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले, "मी हिंदू असल्याचा मला अभिमान वाटतो"
यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी G-20 शिखर परिषदेच्या बाजूला द्विपक्षीय चर्चा केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर हँडलवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भेटीबद्दल ट्विट केले.
८ ते १० सप्टेंबर दरम्यान पीएम मोदी जगभरातील नेत्यांसोबत १५ हून अधिक द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. मोदी म्हणाले, द्विपक्षीय बैठकीमुळे मैत्री आणि सहकार्याचे बंध अधिक दृढ होतील. दिल्लीतील भारत मंडपम येथे १८ व्या G20 शिखर परिषदेचे आयोजन करताना मला आनंद होत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी ट्विट केले की, मी येत्या २ दिवसांत जागतिक नेत्यांसोबत अर्थपूर्ण चर्चेसाठी उत्सुक आहे. माझा ठाम विश्वास आहे की नवी दिल्ली येथे होणारी G20 शिखर परिषद मानव-केंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाचा एक नवीन मार्ग तयार करेल.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जागतिक नेते दिल्लीच्या राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहतील. G20 नेते शाश्वत आणि न्याय्य भविष्यासाठी त्यांची सामूहिक दृष्टी सामायिक करतील, निरोगी 'एक पृथ्वी'साठी 'एक कुटुंब' म्हणून एकत्र काम करतील. आज संध्याकाळी मी माझ्या निवासस्थानी तीन द्विपक्षीय बैठकांसाठी उत्सुक आहे. ९ सप्टेंबर रोजी पीएम मोदी यूके, जपान, जर्मनी आणि इटलीच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.