अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे राष्ट्राध्यक्षपदी असताना कोरोनाचा (Corona Pandemic) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता. यावेळी भारताने वेळोवेळी मदत केली होती. मात्र, आता भारतामध्ये कोरोनाने (India) हाहाकार माजविलेला असताना अमेरिकेने (America) मदत करण्यास नकार दिला होता. यामुळे अडचणीत आलेल्या जो बायडेन (joe biden) सरकारने लगेचच यू-टर्न घेत आताचा आमच्या मदतीची वेळ असल्याचे म्हटले आहे. तसेच लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी देखील हटविण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची फोनवरून महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. "आम्ही दोन्ही देशांतील कोरोनाच्या परिस्थितीविषयी तपशीलवार चर्चा केली. तसंच अमेरिकेकडून भारताला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले," अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली. "लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबतही आमची महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. भारत अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असलेली आरोग्य क्षेत्रातील भागीदारी कोरोनाचं जागतिक आव्हान सोडवू शकते," असंही ते म्हणाले.
Coronavirus Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी, जो बायडेन यांच्यात फोनवरून संवाद; लसीच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर महत्त्वपूर्ण चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 10:41 PM
Coronavirus Vaccine : यापूर्वी अमेरिकेनं कोरोनाच्या लसीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातली होती बंदी.
ठळक मुद्देयापूर्वी अमेरिकेनं कोरोनाच्या लसीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातली होती बंदी.परंतु नंतर वाढलेल्या दबावामुळे बायडेन यांनी आडमुठी भूमिका सोडली