'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 05:34 PM2024-04-28T17:34:56+5:302024-04-28T17:35:22+5:30
मोदी म्हणाले, "वायनाडमध्ये ज्या लोकांचा संबंध बंदी घातलेल्या पीएफआयसोबत आहे, अशा लोकांकडून या संघटनेची मदत घेतली जात आहे. हेच तर काँग्रेसचे ट्रॅक रेकॉर्ड आहे. दहशत वाद्यांना मारल्यानंतर या लोकांच्या डोळ्यात पाणी येत होते.
बेंगलोरमध्ये ते सत्तेवर आल्यानंतर, एका कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला. यासंदर्भात त्यांनी काय विधान केले? म्हणाले, गॅस सिलिंडर फुटले, अरे! तुमचं डोकं फुटलं आहे की, गॅसचं सिलिंडर? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारवर थेट हल्ला चढवला. ते रविवारी कर्नाटकातील सिर्सी येथे एका प्रचारसभेत बोलत होते.
मोदी म्हणाले, "वायनाडमध्ये ज्या लोकांचा संबंध बंदी घातलेल्या पीएफआयसोबत आहे, अशा लोकांकडून या संघटनेची मदत घेतली जात आहे. हेच तर काँग्रेसचे ट्रॅक रेकॉर्ड आहे. दहशत वाद्यांना मारल्यानंतर या लोकांच्या डोळ्यात पाणी येत होते. आपल्याला आठवतच असेल की, दिल्लीत अशी घटना घडली होती, तेव्हा, दहशतवाद्याला का मारले गेले, म्हणून काँग्रेसच्या एक नेत्याच्या डोळ्यात पाणी आले होते."
"मोदींचा जन्म मौजमजा करण्यासाठी झालेला नाही. इश्वराने मोदीला केवळ तुमच्या सेवेसाठी जन्माला घातले आहे आणि आपले स्वप्न हे मोदीचा संकल्प आहे. ही तुम्हाला माझी गॅरंटी आहे. माझा प्रत्येक क्षण तुमच्या नावे, माझा प्रत्येक क्षण तुमच्या मुलांच्या भविष्याच्या नावे, माझा प्रत्येक क्षण तुमची स्वप्नं साकार करण्यासाठी, माझा प्रत्येक क्षण देशाच्या नावे, म्हणून मी तुम्हाला गॅरंटी देतो की, 24/7 आणि 2047 पर्यंत देशाची सेवा," असेही मोदी म्हणाले.
प्रभू श्रीरामांसाठी 500 वर्षांपर्यंत संघर्ष करावा लागला -
राम मंदिराचा संदर्भ देत मोदी म्हणाले, "माझे आणि आपले पूर्वज अयोध्येत प्रभू रामचंद्रांसाठी 500 वर्षं लढत होते. हा काही कमी कालावधी नाही. यात लाखो लोक मारले गेले. प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्याचा निर्णय देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता. मात्र, त्यांनी तसे केले नाही. असे काम करण्यासाठी 56 इंचाची छाती लागते. तरच 500 वर्षांचे स्वप्न आणि 500 वर्षांची प्रतीक्षा संपते. मात्र, हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा आपल्या मतांची ताकद मिळते."