नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने अटल भूजल योजना सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल या नवीन योजनेचं उद्घाटन केलं आहे.
अटल भूजल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यात येईल. तसेच ज्या भागांतील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे किंवा वेगाने घट होत आहे, अशा भागांत विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशमधील रोहतांग पास येथे तयार करण्यात आलेल्या बोगदा 'अटल टनल' नावाने ओळखले जाणार असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.
अटल भूजल योजनेवर पाच वर्षामध्ये (2020-21 ते 2024-25) सहा हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा महाराष्ट्रासह हरयाणा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना होईल. ही सात राज्ये वाटत असली तरी या देशाचा ५० टक्के भाग आहेत. तसेच या सात राज्यांतील ७८ जिल्ह्यांमधील ८३०० गावांमधील पाणीपातळीची स्थिती खूपच गंभीर असल्याचे देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितले.