नवी दिल्ली : देशाला एक-दोन नव्हे तर 9 वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन्सची भेट मिळणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवार (24 सप्टेंबर) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यांमध्ये एकाच वेळी 9 वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन्सचा शुभारंभ करतील.
देशवासीयांना जवळपास सर्वच राज्यांमध्ये लक्झरी आणि सेमी हाय स्पीड ट्रेन्सचा अनुभव मिळत आहे. देशात एकाच वेळी नऊ ट्रेन्स सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, आता येत्या रविवारी आणखी 9 ट्रेन्स सुरू होणार असल्याने देशातील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन्सची संख्या 33 होणार आहे.
सध्या देशात 23 वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. या ट्रेन्स ईशान्येकडील राज्ये वगळता सर्व राज्यांमध्ये धावत आहेत. मात्र, ईशान्येकडील आसाममधून वंदे भारत ट्रेनही धावत आहे. दोन ट्रेन या राखीव ठेवण्यात आल्या आहेत, त्या गरज पडल्यास वापरता येतील. रविवारी सुरू होणार्या 9 वंदे भारत ट्रेन कोणत्या मार्गांवर धावणार आहेत, ते जाणून घ्या.
'या' ठिकाणी 9 वंदे भारत ट्रेन्स सुरू होणार!रांची-हावडापाटणा-हावडाविजयवाडा-चेन्नईतिरुनेलवेली-चेन्नईराउरकेला-पुरीउदयपूर-जयपूरकासारगोड-तिरुवनंतपुरमजामनगर-अहमदाबाद हैदराबाद-बंगळुरू
लवकरच सुरू होणार वंदे स्लीपर ट्रेन!रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेननंतर लवकरच वंदे स्लीपरही देशातील रुळांवर धावणार आहे. या ट्रेन्समध्ये प्रवासी झोपू शकतील आणि आरामात प्रवास करू शकतील. याशिवाय सरकार लवकरच गरीबांसाठी स्वस्त वंदे ऑर्डिनरी ट्रेनही आणू शकते. या ट्रेन्सचा वेग सामान्य वंदे भारत सारखाच असेल. मात्र, त्याचे भाडे वंदे भारतपेक्षा थोडे कमी असण्याची शक्यता आहे.