नवी दिल्ली:पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याच सप्टेंबर महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जातील, अशी शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत सत्तांतर होऊन जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिकेचा दौरा आहे. (pm narendra modi likely to visit america last week of september no official word on it yet)
“मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही”; खुद्द रतन टाटांनीच केली फेक न्यूजची पोलखोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्याबाबत अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झाले नसले, तरी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत तयारी सुरू असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झालेला नाही. मात्र, २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर असतील, असे सांगितले जात आहे.
“मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप
अमेरिकेतील सत्तांतरानंतर पहिलाच दौरा
अमेरिकेत सत्तांतर होऊन जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल. पंतप्रधान मोदी यांची आणि जो बायडन यांची पहिली वैयक्तिक भेट ठरणार आहे. यापूर्वी ३ प्रसंगी या दोन्ही नेत्यांची आभासी भेट झाली होती. पंतप्रधान मोदी जी-७ शिखर परिषदेसाठी इंग्लंडला जाणार होते. तिथे ते बायडेन यांना भेटू शकले असते. मात्र, कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करावा लागला होता.
“BJP नेत्यांनी जवळच्या नशामुक्ती केंद्राशी संपर्क साधावा”; काँग्रेसचा खोचक टोला
तालिबान, चीनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा
अमेरिकेतील सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानने एकेक करत अफगाणिस्तानवर ताबा मिळवत सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती झपाट्याने बदलत आणि चिंताजनक रूप धारण करत असताना मोदी आणि बायडेन यांची ही भेट महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी चीनवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
TATA ग्रुपचा मोदी सरकारला पाठिंबा; एलन मस्कच्या ‘त्या’ मागणीला केला जोरदार विरोध
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी बायडेन प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. ज्यात परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन आणि उपसचिव वेंडी शर्मन यांचा समावेश होता. यावेळी, धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. याआधी सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका दौरा केला होता. अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाला संबोधित केले होते.