गुरुवारी भारतानं १०० कोटी करोना प्रतिबंधात्मक लसींचा टप्पा पार केला. देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात वेद वाक्यानं केली. आपल्या देशानं एकीकडे कर्तव्याचं पालन केलं आणि दुसरीकडे यशही मिळालं, असं मोदी यावेळी म्हणाले. गुरूवारी भारतानं १०० कोटी डोसचं कठीण लक्ष पार केलं. यामागे देशवासीयांचा पाठिंबाही होता. हे देशवासीयांचं, भारताचं यश आहे. १०० कोटी डोस हे केवळ एक आकडा नाही. हे देशाच्या सामर्थ्यांचं प्रतिबिंब आहे. इतिहासाच्या नव्या अध्यायाची रचना आहे. कठिण ध्येयापर्यंत पोहोचणं जाणतो अशा भारताचं हे प्रतिबिंब आहे, असं मोदी देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले.
"आज अनेक लोकं अन्य देशांशी या लसीकरणाची तुलना करत आहेत. जगातील अन्य देशांसाठी लसीवर रिचर्च करणं, ते शोधणं यात ते एक्सपर्ट होते. आपण अनेक लसी बाहेरून मागवत होतो. जेव्हा १०० वर्षांमधील मोठी महासाथ आली तेव्हा भारतावर प्रश्न उपस्थित करण्य़ात आले. भारत लसी कुठून आणणार, पैसे कसे उभारणा, महासाथीला आळा घालण्यासाठी भारत प्रयत्न करू शकेल का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे १०० कोटी लसींचे डोस त्याचं उदाहरण देत आहे. आज भारतानं १०० कोटी डोस मोफत दिले आहे. आज जग भारताला कोरोनापासून भारताला सर्वात सुरक्षित मानेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आज जग भारताची ताकद पाहत आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
Co-Win अॅपचं कौतुक"आपण वेगानं लसीकरण करण्यासाठी एक यंत्रणा उभारली. कोविन अॅपचं आज जगभरातून कौतुक होत आहे. १०० कोटॉ डोस पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु भारतानं ते शक्य करून दाखवलं. भारतानं त्यासाठी एक यंत्रणा उभारली. लसीकरण मोहिमेदरम्यान भारतानं विज्ञानाची साथन सोडली नाही. लसीकरणामुळे अर्थव्यवस्थेन नवा उत्साह आला," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोणताही भेदभाव नाहीकोणताही भेदभाव न करता भारतानं विक्रमी लसीकरण करून दाखवलं. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात कोणतंही व्हिआयपी कल्चर शिरू दिलं नाही. यासर्वांमध्ये देशवासींचे प्रयत्न असल्याचंही मोदी म्हणाले.