नवी दिल्ली : क्वाड देशांच्या (Quad Countries) नेत्यांच्या उपस्थितीत होणारी पहिली शिखर परिषद या महिन्याच्या 24 सप्टेंबरला वॉशिंग्टनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. राजनैतिक सुत्रांनी सांगितले की, यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्याला विस्तार देण्यासाठी एक नवीन रुपरेषा तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा या क्वाडमध्ये कामकाजाला वेग देण्यासाठी चर्चा करण्याची शक्यता आहे. (PM Narendra Modi expected to travel to US this month.)
या नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेसाठी वॉशिंग्टनला जाण्याची शक्यता आहे. त्यांचा दौरा हा न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये संबोधित करणे, क्वाड शिखर परिषद आणि राष्ट्राध्यक्ष बायडेनसोबत द्विपक्षीय बैठक करण्याच्या उद्देशाने आयोजित केला जाणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाहीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याची तैयारी सुरु असल्याचे समजते आहे. परराष्ट्र सचिव नुकतेच वॉशिंग्टनला गेले होते. त्यांच्या दौऱ्यावेळी क्वाडच्या नेत्यांची उपस्थिती असणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले होते. हिंदी महासागर-प्रशांत महासागर क्षेत्रात व्यावहारिक सहकार्य सोबतच क्वाडबाबत वॉशिंग्टनची प्रतिबद्धतेबाबत संकेत देण्यासाठी नेत्यांची व्यक्तीगत उपस्थिती परिषदेला असण्याची गरज असल्याचे चर्चिले गेले होते. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दोन वर्षांनी जाणारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधी सप्टेंबर 2019 मध्ये अमेरिकेचा दौरा केला होता. तेव्हा अमेरिकेत निवडणुकीचे वारे होते. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांच्यासाठी हाऊडी मोदी हा कार्यक्रम ह्युस्टनमध्ये घेण्यात आला होता.