शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 3:53 PM

PM Modi Meet Olympics Contingent : या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी स्टार खेळाडू नीरज चोप्रा नरेंद्र मोदींना भेटू शकला नाही.

PM Modi Meet Olympics Contingent : नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा समारोप नुकताच पार पडला. या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या भारताच्या खेळाडुंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) भेट घेतली. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदींनी खेळाडूंना संबोधित केले. यावेळी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पद जिंकणारा भारतीयहॉकी संघ, नेमबाज मनू भाकर, कुस्तीपटू अमन सेहरावत, स्वप्नील कुसळे आणि सरबज्योत सिंग यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. 

या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी स्टार खेळाडू नीरज चोप्रा नरेंद्र मोदींना भेटू शकला नाही. कारण, पॅरिस ऑलिम्पिकमधून तो अद्याप मायदेशी परतला नाही. नीरज चोप्रा उपचारासाठी जर्मनीला गेला आहे. दुसरीकडे, बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूही वैयक्तिक कारणांमुळं भेटायला आली नाही. पीव्ही सिंधूला यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मोठी कामगिरी करता आली नाही. ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकली नाही. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं सहा पदकं जिंकली आहेत. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा केली. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचे नरेंद्र मोदी यांनीअभिनंदन केलं. तसंच, २०३६ चे ऑलिम्पिक भारतात व्हावं, यासाठी पूर्ण तयारी केली जात आहे, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, "मित्रांनो, भारताचं स्वप्न आहे की, २०३६ मध्ये होणारे ऑलिम्पिक भारताच्या भूमीवर व्हावं. त्यासाठी आम्ही तयारी करत आहोत आणि पुढे जात आहोत."

याचबरोबर, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेथे उपस्थित ऑलिम्पिक विजेत्यांचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, "आज तिरंग्याच्या झेंड्याखाली ते तरुण आपल्यासोबत बसले आहेत, ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकवला आहे. १४० कोटी देशवासियांच्या वतीने मी माझ्या देशाच्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो. नवीन स्वप्न, नवीन संकल्प आणि प्रयत्नांसह नवीन ध्येयाकडे वाटचाल करू."

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं ५ कांस्य पदकं जिंकली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका रौप्य पदकाशिवाय भारताला ५ कांस्य पदकं मिळाली आहेत. 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकलं. गेल्यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकलं होतं. यावेळी तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. नेमबाज मनू भाकरनं २ कांस्यपदकं जिंकली. तिनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं. याशिवाय तिनं सरबज्योत सिंगसोबत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं. नेमबाज स्वप्नील कुसाळेनेही कांस्यपदक पटकावलं. तर पुरुष हॉकी संघ आणि कुस्तीपटू अमन सेहरावतनं कांस्यपदक जिंकलं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतHockeyहॉकी