अहमदाबाद - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून बुधवारी (17 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुजरातच्या दौ-यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व बेंजामिन नेतान्याहू यांनी अहमदाबाद विमानतळ ते साबरमती आश्रमापर्यंत रोड शोदेखील केला. विमानतळ ते साबरमती आश्रम यादरम्यान ८ कि.मी.च्या अंतरात हा रोड शो करण्यात आला. यानंतर पंतप्रधान मोदी, इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांची पत्नी यांनी साबरमती आश्रमालादेखील भेट दिली. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यासोबतही रोड शो केला होता.
ताज महालला दिली भेटइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पत्नी सारा यांच्यासह मंगळवारी (16 जानेवारी) ताजमहालला भेट दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी स्थानिक कलाकारांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. नेतन्याहू यांच्या ताज भेटीच्या पार्श्वभूमीवर सामान्य पर्यटकांसाठी ताजमहलचा प्रवेश दोन तास बंद होता.समुद्राचे पाणी शुद्ध करणारी मशीन भेटइस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू हे मोदी यांना एक जीप भेट देणार आहेत. यामध्ये समुद्राचे पाणी शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान आहे. ही जीप भारतात दाखल झाली आहे. आता ही जीप गुजरातमध्ये भूज येथे पाठविण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी शुद्ध करण्याचा हा प्रयोग दोन्ही देशांचे पंतप्रधान १७ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दाखविणार आहेत. या जीपची किंमत १,११,००० डॉलर आहे.