PM Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही पंतप्रधान मोदींची जादू पाहायला मिळत आहे. हा दावा आम्ही नाही, तर मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणातून केला जात आहे. सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीत 22 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे टाकले आहे. ताज्या सर्वेक्षणात पीएम मोदींना 78 टक्के रेटिंग्स मिळाले आहे.
'मॉर्निंग कन्सल्ट'चे हे रेटिंग 26 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यानचे आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची अप्रुव्हल रेटिंग 68 टक्के आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पीएम अल्बानीज आहेत, ज्यांचे रेटिंग 58% आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी चौथ्या क्रमांकावर आहेत. मेलोनीचे रेटिंग 52 टक्के आहे.
सहाव्या क्रमांकावर जो बायडन
ब्राझीलचे राष्ट्रपती लुला डी सिल्वा या यादीत 50 टक्के रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत 'महासत्ता' असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची रेटिंग 40 टक्के आहे. त्यांच्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे नाव येते. त्यांची रेटिंग 40 टक्के आहे.
भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक या यादीत 10व्या स्थानावर आहेत. जागतिक नेत्यांमध्ये त्यांचे रेटिंग 30 टक्के आहे. त्याचबरोबर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या यादीत 11व्या स्थानावर आहेत. त्याचे रेटिंग 29 टक्के आहे.
सर्वेक्षण कसे केले जाते?मॉर्निंग कन्सल्ट दररोज 20,000 पेक्षा जास्त जागतिक मुलाखती घेते. मुलाखतीत मिळालेल्या उत्तरांच्या आधारे जागतिक नेत्याबद्दल डेटा तयार केला जातो. अमेरिकेत त्याचा आकार 45,000 हजार आहे. इतर देशांचा आकार 500 ते 5000 च्या दरम्यान आहे. प्रत्येक देशात वय, लिंग, प्रदेश आणि काही देशांमध्ये शिक्षणाच्या आधारावर सर्वेक्षण केले जाते.