नवी दिल्ली: पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर(2 मे ते 4 मे) गेले आहेत. पीएमओने ट्विटरवर नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात भगवा झेंडा हातात घेऊन भारतीय नागरिक ढोल-ताशांच्या तालावर नाचताना दिसत आहेत. आता या व्हिडिओवरुन विरोधी पक्षाने प्रश्न उपस्थित करत आहेत.
सोमवारी पीएम मोदी जर्मनीला पोहोचले होते, तिथे त्यांचे बर्लिनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. भारतीय समुदायातील लोकांनी पूर्ण उत्साहात पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी काही लोक भगव्या रंगाचा झेंडा घेऊन नाचताना दिसले. हाच व्हिडिओ पीएमओने ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'ब्रॅंडनबर्ग गेटवर भारताचा स्वाद, एकदा पहा...'
त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी प्रतिक्रिया दिलीआता विरोधी पक्षनेते आणि इतर लोक या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. शमा मोहम्मद यांनी पीएमओचे ट्विट रिट्विट करत विचारले- 'कोणाचा झेंडा आहे?' त्याचवेळी नागालँड काँग्रेसचे सरचिटणीस जीके झिमोमी म्हणाले- 'तिरंगा कुठे आहे.'
केरळ काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलनेही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. केरळ काँग्रेसने लिहिले- 'भारताचे पंतप्रधान महोदय, तुम्ही परदेशात देशाचे प्रतिनिधित्व करता, तुम्ही या मूर्खपणाचा प्रचार केल्याबद्दल देशाची माफी मागावी.'
दुसरीकडे, यूपी काँग्रेसच्या नेत्या सदफ जाफर म्हणाल्या- 'तिरंगा हा भारताचा अभिमान आहे...' या मुद्द्यावर प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब म्हणाले- 'हा भारतीय तिरंगा आहे का?'
काँग्रेसच्या आणखी एका राष्ट्रीय प्रवक्त्या रागिणी नायक यांनी लिहिले- 'हा भारताचा राष्ट्रध्वज नाही, मोदीजी.' काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढ़ी लिहितात- 'भारताचा तिरंगा ध्वज कुठे आहे?'
2022 मधील पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. गेल्या वर्षी 29 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधानांनी शेवटच्या वेळी इटली आणि यूकेला भेट दिली होती.