गांधीनगर: भारतीय जनता पक्षानं निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधून जाऊन आईची भेट घेतली. दोन वर्षांनंतर मोदी आई हिराबेन यांच्या भेटीसाठी पोहोचले. याआधी ऑक्टोबर २०१९ मध्ये मोदींनी आईंची भेट घेतली होती. यानंतर मोदी सातत्यानं व्यग्र होते. त्यामुळे त्यांना आईची भेट घेता आला नाही. काल पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आज मोदी गुजरातमध्ये पोहोचले.
गुजरातच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. मोदी आईसोबत जेवले. याआधीही मोदींनी जेव्हा जेव्हा आईची भेट घेतली, तेव्हा तेव्हा त्यांचे फोटो व्हायरल झाले. मोदींनी आज आईची भेट घेऊन तिचे आशीर्वाद घेतले.
आज सकाळपासून मोदींनी गुजरातचा दौरा सुरू केला. सकाळी मोदींनी अहमदाबादमध्ये रोड शो केला. त्यामध्ये प्रचंड गर्दी होती. त्यानंतर मोदींनी पंचायत संमेलनात सहभागी घेतला. त्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरणावर त्यांनी भर दिला. गुजरातमधील पंचायतींमध्ये महिलांचं प्रमाण वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.